Join us  

अनुष्का, कुटूंब, बालपणीच्या प्रशिक्षकांसह फक्त MS Dhoni ने मला मदत केली; विराट कोहलीचं मोठं विधान 

Virat Kohli on RCB podcast  - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) पॉडकास्ट सीझन २ मध्ये विराट कोहलीने कसं कठीण काळात महेंद्रसिंग धोनीने त्याला दोनवेळा साथ दिली याबाबत सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 10:40 AM

Open in App

Virat Kohli on RCB podcast  - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) पॉडकास्ट सीझन २ मध्ये विराट कोहलीने कसं कठीण काळात महेंद्रसिंग धोनीने त्याला दोनवेळा साथ दिली याबाबत सांगितले. एमएस धोनीच्या मॅसेजनंतर, विराट कोहलीला जाणवले की त्याला एक पाऊल मागे घेण्याची आणि याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे.

कोहली म्हणाला, 'कठीण काळात अनुष्का माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरली. कारण, ती या सर्व काळात माझ्यासोबत आहे आणि तिने मला खूप जवळून पाहिले आहे. मला कसे वाटते. माझ्या बालपणीच्या प्रशिक्षक आणि कुटुंबाशिवाय ज्या काही गोष्टी घडल्या त्यामधून मी गेलो आहे. यांच्याव्यतिरिक्त मला खरोखर मदत करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे महेंद्रसिंग धोनी. तो माझ्यापर्यंत पोहोचला, कारण तुम्ही त्याच्याकडे क्वचितच जाऊ शकता. जेव्हा मी त्याला कॉल करतो तेव्हा ९९ टक्के तो फोन उचलत नाही कारण तो फोन पाहत नाही. अशात तो माझ्यापर्यंत पोहोचला. आतापर्यंत असे दोनदा झाले आहे.''

कोहली म्हणाला, 'यावेळी त्याने आपल्या मॅसेज पाठवला, त्यात लिहिले होते की, 'जेव्हा तुम्ही बलवान असण्याची अपेक्षा केली जाते आणि एक मजबूत व्यक्ती म्हणून पाहिले जाते, तेव्हा लोक तुम्ही कसे आहात हेच आपल्याला विचारत नाहीत?' धोनीचे शब्द माझ्या मनात घर करून आहेत, कारण माझ्यात खूप आत्मविश्वास आहे, माझी मानसिकता खूप मजबूत आहे आणि कोणत्याही परिस्थितीला हाताळू शकतो. सहन करू शकतो आणि मार्ग शोधू शकतो, अशी माझ्याप्रती सर्वांचा समज आहे.  कधीकधी, तुम्हाला असे वाटते की, एक माणूस म्हणून जीवनाच्या एखाद्या टप्प्यावर तुम्हाला काही पावले मागे जाण्याची गरज आहे. समजून घ्या की तुम्ही कसे आहात, तुमचं हित कशात आहे.'' कोहलीने २००८ ते २०१९ ही ११ वर्षी धोनीसोबत भारतीय संघाचे ड्रेसिंग रुम शेअर केले आहे. कोहली म्हणाला, 'मी आतापर्यंत जे अनुभवले आहे, त्यानेही तेच अनुभवले आहे. त्यामुळे त्या गोष्टीतून गेलेल्या व्यक्तीलाच ते अनुभवता येते. फक्त तोच त्या भावना आणि तो क्षण अनुभवू शकतो.'' विराटने १५ वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी १०६ कसोटी,२७१ वन डे आणि ११५ ट्वेंटी-२०  आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि २५०००+ आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :विराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App