जोहान्सबर्ग : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने रविवारी आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. आफ्रिका दौ-यामध्ये धोनी आपल्या फलंदाजीने छाप पाडण्यात अपयशी ठरला असला तरी आपल्या चपळ यष्टिरक्षणाने तो नवनवे विक्रम रचत आहे. 36 वर्षांच्या धोनीने जोहान्सबर्गमध्ये मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला.
आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर रेजा हेंड्रिक्सचा कॅच घेताच टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक कॅच घेणारा विकेटकिपर धोनी ठरला. हा धोनीच्या टी-20 करिअरमधला 275 व्या सामन्यातला 134 वा कॅच ठरला. यापूर्वी श्रीलंकेचा माजी यष्टीरक्षक-कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर(133 कॅच) हा विक्रम होता. भारताचाच दिनेश कार्तिक या यादीमध्ये तिस-या क्रमांकावर आहे. कार्तिकने 227 सामन्यांमध्ये 123 कॅच पकडले आहेत, तर 211 सामन्यांमध्ये 115 कॅच घेऊन पाकिस्तानचा कामरान अकमल चौथ्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजच्या दिनेश रामदीनने 168 सामन्यांमध्ये 108 कॅच घेतले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांचा विचार केल्यास स्टंपच्या मागे सर्वाधिक बळी घेणारा विकेटकिपर म्हणून धोनीला ओळखलं जातं. त्याने 87 सामन्यांमध्ये 77 बळी घेतले आहेत, त्यामध्ये 48 कॅच तर 29 स्टंपिंगचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेविरोधात वनडे सीरीजमध्ये विकेटकीपर धोनी -
तीसरी वनडे - वनडेमध्ये 400 बळी पूर्ण
पांचवी वनडे - लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण
सहावी वनडे - इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 600 कॅच पूर्ण
Web Title: M.S.Dhoni t-20 record most catches as a wicketkeeper
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.