Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:"मी नाराज आहे पण...", 'मारो मुझे मारो' फेम मोमीनने घेतली किंग कोहलीची भेट, व्हिडीओ व्हायरल

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 02:07 PM2022-08-29T14:07:12+5:302022-08-29T14:08:41+5:30

whatsapp join usJoin us
Mujhe maaro' meme fame Momin Saqib meets Virat Kohli after IND vs PAK match, watch video  | Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:"मी नाराज आहे पण...", 'मारो मुझे मारो' फेम मोमीनने घेतली किंग कोहलीची भेट, व्हिडीओ व्हायरल

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight:"मी नाराज आहे पण...", 'मारो मुझे मारो' फेम मोमीनने घेतली किंग कोहलीची भेट, व्हिडीओ व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Pakistan । नवी दिल्ली : भारतीय संघाने पाकिस्तानला (IND vs PAK) चितपट करून आशिया चषकात (Asia Cup 2022) विजयी सलामी दिली आहे. चुरशीच्या लढतीत भारताने 5 बळी आणि 2 चेंडू राखून विजय मिळवला. टी-20 विश्वचषकात झालेल्या पराभवाचा बदला घेत भारतीय संघाने महत्त्वपूर्ण विजय मिळवला. भारताकडून हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नाबाद 35 धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. दोन्हीही संघांनी शानदार क्रिकेट खेळून चाहत्यांचे मनोरंजन केले मात्र हार्दिकच्या मॅच विनिंग खेळीने सर्वांनाच आकर्षित केले. त्याने अखेरच्या 3 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता असताना विजयी षटकार ठोकून प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारली. सामना संपल्यानंतर पाकिस्तानचा चाहता 'मारो मुझे मारो' फेम मोमीन साकीबने (Momin Saqib) विराट कोहलीची (Virat Kohli) भेट घेतली. 

दरम्यान, 'मारो मुझे मारो' या एका डायलॉगमुळे जगभर प्रसिद्ध असलेल्या मोमीनने पाकिस्तानच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. मात्र भारताने त्याच्या डायलॉगनुसार 'जज्बात बदल दिये' आणि प्रतिस्पर्धी संघाला चितपट केले. 2019 च्या विश्वचषकातील पाकिस्तानच्या पराभवानंतर मोमीन जगासमोर आला होता. रविवारी झालेल्या सामन्यानंतर त्याने किंग कोहलीची भेट घेऊन त्याचे अभिनंदन केले. कोहलीने या सामन्यात 25 धावांची साजेशी खेळी करून भारताच्या विजयात हातभार लावला. 

भारत-पाकिस्तान फायनलमध्ये भिडणार 
साकिबने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो कोहलीशी मूळ पंजाबी भाषेत बोलत आहे. कोहलीचे अभिनंदन केल्यानंतर, साकिबने कबूल केले की तो पाकिस्तानचा चाहता असल्याने आजचा दिवस दुःखद आहे. तसेच दोन आठवड्यांच्या कालावधीत दोन्ही संघ पुन्हा अंतिम फेरीत भेटतील अशी आशा त्याने व्यक्त केली. "आज थोडा दु:खी आहे पण काळजी करू नका, आम्ही एकत्र फायनल खेळू", असे म्हणून त्याने भारत-पाकिस्तानमध्ये फायनल होईल असा विश्वास व्यक्त केला. ज्याला कोहलीने उत्तर दिले की, "हे घडत राहत असेत, तुला पाहून आनंद झाला."


 

Web Title: Mujhe maaro' meme fame Momin Saqib meets Virat Kohli after IND vs PAK match, watch video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.