Join us  

Mukesh Chaudhary Super Catch, IPL 2022 CSK vs RCB: चेंडू हवेत जाताच मुकेश धावत सुटला अन् हवेत झेपावत टिपला अप्रतिम कॅच!

मुकेशने झेल टिपला पण त्याला एकही बळी मिळाला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 10:20 PM

Open in App

Mukesh Chaudhary Super Catch, IPL 2022 CSK vs RCB: चेन्नई सुपर किेंग्ज विरूद्धच्या सामन्यात RCB ने २० षटकांत १७३ धावांपर्यंत मजल मारली. रॉयल चॅलेंजर्सकडून कोणत्याही एका फलंदाजाने मोठी खेळी केली नाही, पण अनेक खेळाडूंच्या छोटेखानी खेळींच्या जोरावर RCB ने CSK ला १७४ धावांचे आव्हान दिले. महिपाल लॉमरॉरने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. पहिल्या डावात मुकेश चौधरीने टिपलेला झेल भाव खाऊन गेला.

RCB ने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली. विराट कोहली ३० तर फाफ डु प्लेसिसने ३८ धावा केल्या. अर्धशतकी सलामी दिल्यानंतर ते दोघेही बाद झाले. ग्लेन मॅक्सवेल ३ धावांवर बाद झाला. त्यानंतर रजत पाटीदार खेळण्यासाठी आला. त्याने वेगाने धावा करण्यास सुरूवात केली. १५ चेंडूत २१ धावा केल्यानंतर त्याने हवेत फटका मारला. त्यावेळी मुकेशने अतिशय वेगाने धावत येऊन झेल टिपला.

हवेत झेपावत टिपला अप्रतिम कॅच, पाहा Video-

रजत पाटीदारचा झेल टिपल्यानंतर महिपाल लोमरॉरने फटकेबाजी सुरू ठेवली. २७ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने त्याने सर्वाधिक ४२ धावा केल्या. वनिंदू हसरंगा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिकने फिनिशरची भूमिका नीट बजावली. १७ चेंडूत त्याने नाबाद २६ धावा केल्या.

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली
Open in App