काही दिवसांपूर्वी गौतम अदानी समुहाने Women's Premier Leagueमधील अहमदाबाद फ्रँचायझीसाठी सर्वाधिक १२८९ कोटींची बोली लावली, परंतु त्याच्या काही तासानंतर हिंडेनबर्ग या अमेरिकन संस्थेचा अहवाल समोर आला अन् अदानी एंटरप्रायझेससह समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने घसरले. त्याच दिवशी अदानी समुहाला ४६ हजार कोटींपेक्षा अधिक फटका बसला. अदानी समुहावर टीका होत असताना क्रिकेटच्या मैदानावरून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या मैदानावर अंबानी विरुद्ध अदानी असा सामना रंगणार आहे.
महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. महिला प्रीमिअर लीगसाठी बीसीसीआयने मागवलेल्या प्रसारण हक्काच्या बोलीत वायकॉम १८ ने डिझनी स्टार आणि सोनीला मागे टाकून पाच वर्षांसाठी ९५१ कोटींची सर्वाधिक बोली लावली. १३ फेब्रुवारीला WPL Auction होणार आहे. त्याआधी आज Cricbuzz ने महिला प्रीमिअर लीगचे वेळापत्रक जाहीर केले.
इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार महिला प्रीमिअर लीगची ४ मार्चला सुरुवात ही टीम मुंबई व टीम अहमदाबाद यांच्यातील लढतीने होईल. म्हणजेच अंबानी विरुद्ध अदानी असा सामना रंगणार आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर या लीगची सुरुवात होणार आहे आणि BCCI तशी आखणी करत आहे. सीसीआय व डी वाय पाटील स्टेडियमवर ४ ते २६ मार्च या कालावधीत या लीगचे सामने खेळवले जातील. वानखेडे स्टेडियमवर १७ मार्चला भारत-ऑस्ट्रेलिया वन डे सामना होणार आहे आणि त्यामुळे येथे महिला प्रीमिअर लीगच्या लढती होणे अशक्य आहेत. त्यात १ एप्रिलपासून इंडियन प्रीमिअर लीगलाही सुरुवात होणार आहे.
महिला प्रीमिअर लीगची दुसरी लढत टीम बंगळुरू विरुद्ध टीम दिल्ली अशी ५ मार्चला सीसीआयवर होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. पाच संघांचा समावेश असलेल्या या लीगमध्ये एकच एलिमिनेटर सामना असेल. पाचपैकी तीन संघ प्ले ऑफमध्ये स्थान पक्के करतील. पहिल्या क्रमांकाचा संघ थेट फायनलमध्ये जाईल. तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या संघात एलिमिनेटरचा सामना होईल. एकूण २२ सामने खेळवले जातील.
- WPL च्या लिलावात केवळ ९० खेळाडूंची निवड केली जाणार आहे
- प्रत्येक संघाला १८ खेळाडूंचीच निवड करता येणार आहे, १५० खेळाडूंचा एक संच असणार आहे
- ५०, ४० व २० लाख अशा तीन बेस प्राईज ( मुळ किंमत) ठेवण्यात आल्या आहेत
- अनकॅप्ड खेळाडूसाठी १० ते २० लाखांची बेस प्राईज ठेवली जाईल
- प्रत्येक फ्रँचायझीच्या पर्सची मर्यादा १२ कोटी ठेवण्यात आली आहे
- महिला प्रीमिअर लीगसाठी पाच फ्रँचायझींनी मिळून ४६६९.९९ कोटी मोजले
- ४ ते २६ मार्च या कालावधीत महिला प्रीमिअर लीग होण्याची शक्यता
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Mumbai (Ambani) will take on Ahmedabad (Adani) in the first match of Women's Premier League; CCI, DY Patil to host WPL from March 4-26
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.