अबुधाबी : गेल्या लढतीत शानदार कामगिरी केल्यानंतरही पराभव स्वीकारावा लागलेला मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघ गुरुवारी येथे खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) सामन्यांत चुका टाळून फॉर्म मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतील. किंग्स इलेव्हनला राजस्थान रॉयल्सविरुद्ध रविवारी पराभव स्वीकारावा लागला. दुसºया बाजूला मुंबई इंडियन्सवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने मात केली.
रॉयल्सविरुद्ध पंजाबचे गोलंदाज फॉर्मात नसल्याचे दिसून आले. येवढेच नव्हे तर फॉर्मात असलेल्या शमीने ४ षटकांत ५३ धावा बहाल केल्या. मुंबईला जर सामना जिंकायचा असेल तर त्यांना किंग्स इलेव्हनची फॉर्मात असलेली सलामीची जोडी राहुल व मयंक अग्रवाल यांना झटपट माघारी परतवावे लागेल.दोघांनी आतापर्यंत प्रत्येकी एकदा शतक तर एकदा अर्धशतक ठोकले आहे. मुंबई संघ यापूर्वी या मैदानावर खेळला असून त्याचा ते लाभ घेण्याचा प्रयत्न करतील. त्यांनी यापूर्वी दोन सामने या मैदानावर खेळले आहेत.सॅमसन सर्व प्रकारात खेळेल : शेन वॉर्नआॅस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सचा आक्रमक फलंदाज संजू सॅमसनमुळे प्रभावित झाला आहे. ‘संजू यंदा कामगिरीत सातत्य राखेल अशी आशा आहे. तो भारतीय संघात प्रतिनिधित्व करताना दिसेल,’ असे वॉर्नला वाटते.