Join us  

Mumbai Ranji Trophy : Prithvi Shaw च्या नेतृत्वाखाली मुंबईचा ऐतिहासिक विजय, मोडला ९४ वर्षांपासून इंग्लंडच्या नावावर असलेला विक्रम

Biggest victory in terms of runs in First Class cricket: पृथ्वी शॉ (  Prithvi Shaw )  याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ऐतिहासिक विजयाचीन नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 3:54 PM

Open in App

Biggest victory in terms of runs in First Class cricket: पृथ्वी शॉ (  Prithvi Shaw )  याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत ऐतिहासिक विजयाचीन नोंद केली. मुंबईने उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश मिळवताना उत्तराखंडवर ७२५ धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला. मुंबईने या कामगिरीसह १९२८पासून इंग्लंडच्या नावावर असलेला विक्रम आता मुंबईच्या नावावर नोंदवला गेला आहे. 

सुवेध पारकर ( 252) व सर्फराज खान ( 153) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 8 बाद 647 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर शाम्स मुलानीने  (5-39) निम्मा संघ माघारी पाठवून उत्तराखंडचा पहिला डाव 114 धावांत गुंडाळला. मोहित अवस्थीने दोन, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे व तनुष कोटियान  यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मुंबईच्या दुसऱ्या डावात कर्णधार पृथ्वीने 80 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकारांसह 72 धावांची खेळी केली. यशस्वी व आदित्य तरे यांनी चांगला खेळ केला. आदित्यने 56 चेंडूंत 57 धावा केल्या. दुसराच प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या यशस्वीने पहिले शतक झळकावले. त्याने 150 चेंडूंत 103 धावा केल्या. यातील 52 धावा या चौकार ( 10) व षटकारांतून ( 2) आल्या. मुंबईने दुसरा डाव ३ बाद २६१ धावांवर घोषित केला. 

७९५ धावांचे अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तराखंडचा संघ दबला गेला आणि ६९ धावांत त्यांचे १० फलंदाज माघारी परतले. धवल कुलकर्णी ( ६-५-११-३), शाम्स मुलानी (  ७-४-१५-३) आणि तनुष कोटियन ( ३.५-०-१३-३)  यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. मोहित अवस्थीने एक विकेट घेतली. 

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय

  • ७२५ - मुंबई विजयी वि. उत्तराखंड, आज
  • ६७५   - इंग्लंड विजयी वि. ऑस्ट्रेलिया, १९२८ 
टॅग्स :रणजी करंडकमुंबईपृथ्वी शॉउत्तराखंडइंग्लंड
Open in App