मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवची वादळी खेळी; थोडक्यात हुकलं ट्वेंटी-20तील शतक

मुंबई क्रिकेट संघानं सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेच्या सुपर लीग गटातील विजयी घोडदौड कायम राखली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 02:48 PM2019-11-25T14:48:59+5:302019-11-25T14:51:15+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai captain Suryakumar Yadav scored unbeaten 94 from 53 balls including 11 fours and 4 sixes against Karnataka | मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवची वादळी खेळी; थोडक्यात हुकलं ट्वेंटी-20तील शतक

मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवची वादळी खेळी; थोडक्यात हुकलं ट्वेंटी-20तील शतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई क्रिकेट संघानं सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेच्या सुपर लीग गटातील विजयी घोडदौड कायम राखली आहे. रविवारी झारखंडविरुद्ध पृथ्वी शॉच्या दमदार फटकेबाजीचा आस्वाद घेणाऱ्या मुंबईच्या पाठीराख्यांसाठी कर्णधार सूर्यकुमार यादवनं दमदार खेळी केली. पण, सूर्यकुमारला थोडक्यात शतकापासून वंचित रहावं लागल्याचं दुःख त्यांना सहन करावं लागलं. मुंबईनं सोमवारी झालेल्या या सामन्यात कर्नाटकवर 7 विकेट आणि 6 चेंडू राखून विजय मिळवला.


प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकचा सलामीवीर लोकेश राहुल भोपळा न फोडताच माघारी परतला. शाम्स मुलानीनं त्याला यष्टिरक्षक आदित्य तरेकरवी झेलबाद केलं. त्यानंतर कर्णधार मनिष पांडेही (4) शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. देवदत्त पडीक्कल आणि रोहन कदम यांनी अर्धशतकी खेळी करताना कर्नाटकला 20 षटकांत 6 बाद 171 धावांपर्यंत मजल मारून दिली. देवदत्तनं 34 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून 57 धावा केल्या. रोहननं 47 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकारांसह 71 धावा चोपल्या. मुंबईकडून शिवम दुबे आणि शार्दूल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉनं मुंबईला धडाक्यात सुरुवात करून दिली. त्यानं 17 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार खेचून 30 धावा केल्या. पण, त्यानंतर आदित्य तरे ( 12) आणि श्रेयस अय्यर ( 14) लगेच माघारी परतल्यानं मुंबईला धक्का बसला. कर्णधार सूर्यकुमारनं मुंबईचा डाव सावरला. त्यानं 53 चेंडूंत 11 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 94 धावा केल्या. शिवम दुबेनं 18 चेंडूंत 2 खणखणीत षटकार लगावताना नाबाद 22 धावा केल्या. 

Web Title: Mumbai captain Suryakumar Yadav scored unbeaten 94 from 53 balls including 11 fours and 4 sixes against Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.