Arjun Tendulkar Abuses Cameraman : सचिनच्या मुलाची कॅमेरामनला शिवीगाळ? अर्जुन तेंडुलकरच्या Viral Video वरून दावा 

Arjun Tendulkar Abuses Cameraman : भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनरने नुकतेच कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये पदार्पण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 07:36 PM2023-04-19T19:36:01+5:302023-04-19T19:36:30+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indiands bowler Arjun Tendulkar Abuses Cameraman During Sunriser Hyderabad Vs Mumbai Indians IPL 2023 Match, Video   | Arjun Tendulkar Abuses Cameraman : सचिनच्या मुलाची कॅमेरामनला शिवीगाळ? अर्जुन तेंडुलकरच्या Viral Video वरून दावा 

Arjun Tendulkar Abuses Cameraman : सचिनच्या मुलाची कॅमेरामनला शिवीगाळ? अर्जुन तेंडुलकरच्या Viral Video वरून दावा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Arjun Tendulkar Abuses Cameraman : भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनरने नुकतेच कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये पदार्पण केले.  मंगळवारी अर्जुनने मुंबई इंडियन्सकडून आपला दुसरा आयपीएल सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला आणि अखेरच्या षटकात त्याने विकेट घेत मॅच जिंकवली. भुवनेश्वर कुमारची त्याने विकेट घेतली आणि ही त्याची आयपीएलमधील पहिली विकेट ठरली. त्याने शेवटच्या षटकात मुंबईला १४ धावांनी विजय मिळवून दिला. या सगळ्यात अर्जुनचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून चाहत्यांचे म्हणणे आहे की, सचिनच्या मुलाने कॅमेरामनला शिवी दिली. 

तिला विसरलात ना? आयपीएलमध्ये पुन्हा तिची चर्चा, रोहित शर्माची IPL मधील पहिली मालकीण...

हैदराबादविरुद्ध अर्जुनने अप्रतिम कामगिरी केली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ SRH आणि MI मॅचचा आहे. मुंबई इंडियन्सच्या इनिंगदरम्यान डगआऊटमध्ये बसलेल्या अर्जुनवर कॅमेरा फोकस केला, तेव्हा त्याच्या देहबोलीवरून त्याला राग आल्याचे दिसून आले. तो त्याचा सहकारी खेळाडू तिलक वर्माला काहीतरी बोलू लागला.  सोशल मीडियावरील युजर्स अर्जुनच्या लिप सिंकवरून अंदाज लावत आहेत की त्याने कॅमेरामनला शिवीगाळ केली आहे.  



हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून १९२ धावा केल्या. कॅमेरून ग्रीन (६४*), इशान किशन (३८) आणि तिलक वर्मा (३७) यांनी चांगली फलंदाजी केली. १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादला २० षटकंही खेळता आली नाहीत. १९.५ षटकांत त्यांचा संपूर्ण संघ १७८ धावांवर परतला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Mumbai Indiands bowler Arjun Tendulkar Abuses Cameraman During Sunriser Hyderabad Vs Mumbai Indians IPL 2023 Match, Video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.