मुंबई : रविवारी झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात बाजी मारून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १२व्या सत्राचे दिमाखात जेतेपद पटकावले. यासह चौथ्यांदा आयपीएलवर वर्चस्व राखलेल्या मुंबईकरांनी तब्बल २० करोड रुपयांच्या बक्षिसावरही कब्जा केला. उपविजेता ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघावरही तब्बल १५ करोड रुपयांच्या बक्षिसाचा वर्षाव झाला.
जगातील सर्वात महागडी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएल स्पर्धेत यंदा करोडो रुपयांचा वर्षाव झाला. दखल घेण्याची बाब म्हणजे लीगच्या पहिल्या वर्षापासून ते यंदाच्या बाराव्या सत्रापर्यंत रक्कमेमध्ये तब्बल ३०० टक्क्यांची वाढ झाली. गंमतीची बाब म्हणजे लीगच्या पहिल्या सत्रात जी एकूण बक्षिस रक्कम होती, तेवढी रक्कम यंदा एकट्या मुंबई इंडियन्स मिळाली आहे. यंदाच्या आयपीएल सत्रामध्ये एकूण ५५ करोड रुपयांचे बक्षिस देण्यात आले. यातील २० करोड रुपये विजेत्या मुंबईकरांना मिळाले असून १५ करोड उपविजेत्या चेन्नईला देण्यात आले.
तसेच, गेल्यावर्षी स्पर्धेत एकूण बक्षिस रक्कम ५० करोड रुपयांची होती, जी आता ५५ करोड इतकी करण्यात आली. जगातील विविध क्रिकेट लीग स्पर्धांच्या तुलनेत आयपीएल सर्वात श्रीमंत स्पर्धा असल्याचे मात्र कुणीही टाळणार नाही. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये विजेत्या संघाला २० करोड रुपयांचे बक्षीस मिळाले असताना, कॅरेबियन प्रीमियर लीग (वेस्ट इंडिज), बिग बॅश (आॅस्टेÑलिया) आणि पाकिस्तान प्रीमियर लीग या स्पर्धांतील विजेत्या संघावर मात्र अनुक्रमे ५.७६ करोड, ३.१४ करोड आणि ३ करोड रुपयांचाच वर्षाव झाला होता.
वेगवान अर्धशतक : हार्दिक पांड्या (१ लाख) सर्वोत्तम मैदान (७ हून अधिक सामने) : हैदराबाद (५० लाख) सर्वोत्तम मैदान (७ हून कमी सामने) : पंजाब (२५ लाख)सुपर स्ट्रायकर प्लेअर : आंद्रे रसेल (कार आणि ट्रॉफी)