बेंगळुरू : सातत्याने पराभूत होत असलेले रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि मुंबई इंडियन्स संघांदरम्यान उद्या (मंगळवारी) इंडियन प्रीमिअर लीगमध्ये लढत होणार आहे. उभय संघांचे लक्ष्य विजय मिळवित प्लेआॅफमध्ये स्थान मिळवण्याची आशा कायम राखण्याचे आहे.
चेन्नई सुपरकिंग्जला पुणे येथे पराभूत केल्यानंतर मुंबई इंडियन्स संघ उंचावलेल्या मनोधैर्यासह आरसीबीच्या आव्हानाला सामोरा जाण्यास सज्ज आहे. आरसीबी संघाची फलंदाजीची बाजू मजबूत आहे.
आरसीबीला चेन्नई आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सलग दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळला आहे. आता त्यांच्यासाठी स्थिती कठीण झाली आहे व त्यामुळे कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ कुठली संधी देणार नाही, अशी आशा आहे.
आतापर्यंत उभय संघांची वाटचाल एकसारखीच आहे. मुंबई आणि आरसीबी संघांना सातपैकी दोन सामने जिंकता आले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीलसंघ सरस नेटरनरेटच्या आधारावर सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे मंगळवारच्या लढतीत पराभूत होणाऱ्या संघासाठी प्लेआॅफमध्ये स्थान मिळवण्याचा मार्ग खडतर होईल. पंड्याबंधूंनी गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे, पण त्यांच्याकडून फलंदाजीमध्येही चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. मुंबईच्या गोलंदाजांना सांघिक कामगिरी करता आलेली नाही. युवा लेगस्पिनर मयंक मार्कंडेयने सात सामन्यांत १० बळी घेत छाप सोडली आहे. डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट बुमराह व मुस्तफिजूर यांनी अनुक्रमे ७ व ६ बळी घेतले आहेत. आरसीबीच्या फलंदाजांना रोखण्यासाठी या गोलंदाजांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.
दुसºया बाजूचा विचार करता सात सामन्यांत केवळ दोन विजय मिळवणारा आरसीबी संघ चार गुणांसह सातव्या स्थानी आहे. आरसीबी संघ डिव्हिलियर्सच्या पुनरागमनासाठी प्रार्थना करीत असेल. डिव्हिलियर्सने तापामुळे गेल्या लढतीतून माघार घेतली होती. दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाने आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. कोहली व क्विंटन डीकॉककडून संघाला चांगल्या कामगिरीची आशा आहे, पण त्यांच्या गोलंदाजांना व क्षेत्ररक्षकांना चांगली कामगिरी करावी लागेल. गेल्या लढतीत सुमार क्षेत्ररक्षणामुळे संघाला पराभव स्वीकारावा लागला.
मुंबई इंडियन्स वानखेडे स्टेडियममध्ये आरसीबीविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीतून प्रेरणा घेईल, अशी आशा आहे. त्या लढतीत मुंबई संघाने ४६ धावांनी विजय मिळवला होता. त्या वेळी रोहित शर्मा व एव्हिन लेविसने अर्धशतके झळकावली होती. सूर्यकुमार यादवचा (२७४ धावा) अपवाद वगळता मुंबई संघाच्या अन्य फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. कर्णधार रोहित शर्माला पाच सामन्यांत २० चा आकडा ओलांडण्यात अपयश आले. रोहित गेल्या लढतीप्रमाणे तिसºया क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरू शकतो. तो डावाची सुरुवातही करू शकतो, कारण आघाडीच्या फळीत संघाला त्याची गरज आहे.
Web Title: Mumbai Indians and RCB fight today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.