Women’s Premier League- मुंबई इंडियन्सनेमहिला प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिला पर्वासाठी कर्णधाराची आज घोषणा केली. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur ) हिच्याकडे मुंबई इंडियन्सने महिला संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला. १५० आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटचा अनुभव असलेल्या पहिल्या खेळाडूचा मान नुकताच हरमपप्रीतने पटकावला. भारतीय संघाची ती आधारस्तंभ आहे आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्सनेही तिच्याच नावावर कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केले. अर्जुन पुरस्कार विजेत्या हरमनप्रीतच्या नावावर महिला वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोत्तम ( १७१*) वैयक्तिक खेळीचा विक्रम आहे.
हरमनप्रीत कौरची कर्णधार म्हणून घोषणा करताना नीता अंबानी म्हणाल्या,''मुंबई इंडियन्सच्या महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवताना आम्हाला आनंद होतोय. ती राष्ट्रीय संघाची कर्णधार आहे आणि तिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी अनेक रोमहर्षक विजय मिळवले आहेत. चार्लोट व झुलन यांच्या पाठिंब्यासह हरमनप्रीत मुंबई इंडियन्स महिला संघाची घोडदौड योग्य दिशेने घेऊन जाईल, असा विश्वास आहे.'' मुंबई इंडियन्सचा पहिला सामना ४ मार्चला डी बाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्सविरुद्ध होणार आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians team for WPL) - हरमनप्रीत कौर, नॅट शिव्हर, एमिलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, प्रियांका बाला, सोनम यादव, जिंतिमणी कलित, नीलम बिष्ट.( Harmanpreet Kaur, and comprises of Nat Sciver-Brunt, Amelia Kerr, Pooja Vastrakar, Yastika Bhatia, Heather Graham, Isabelle Wong, Amanjot Kaur, Dhara Gujjar, Saika Ishaque, Hayley Matthews, Chloe Tryon, Humairaa Kaazi, Priyanka Bala, Sonam Yadav, Neelam Bisht, and Jintimani Kalita.)
मुंबई इंडियन्स- मुख्य प्रशिक्षक - चार्लोट एडवर्ड्स, गोलंदाजी प्रशिक्षक व मेंटॉर - झुलन गोस्वामी, फलंदाजी प्रशिक्षक - देविका पळशिकर ( Mumbai Indians' coaching team has Charlotte Edwards (Head Coach), Jhulan Goswami (Bowling Coach and Mentor), Devieka Palshikaar (Batting Coach) and Lydia Greenway (Fielding Coach). )
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Mumbai Indians announced Harmanpreet Kaur as the captain of its women’s team ahead of the inaugural season of Women’s Premier League
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.