Join us  

मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्डला संघाचा कर्णधार बनवला, राशिद खानकडेही दिली मोठी जबाबदारी

Kieron Pollard : मुंबई इंडियन्सच्या आधारस्तंभांपैकी एक असलेल्या किरॉन पोलार्डने १३ हंगाम MIकडून खेळल्यानंतर IPL मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 1:29 PM

Open in App

Kieron Pollard : मुंबई इंडियन्सच्या आधारस्तंभांपैकी एक असलेल्या किरॉन पोलार्डने १३ हंगाम MIकडून खेळल्यानंतर IPL मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून १८९ सामन्यांत ३४१२ धावा केल्या आहेत आणि ६९ विकेट्स घेतल्या आहेत. पोलार्ड इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळणार नसला तरी त्याची फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. तो आता नव्या भूमिकेतून MI कुटुंबासोबत सुरू ठेवणार आहे. पोलार्डला २०१० मध्ये मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले आणि तेव्हापासून मुंबई इंडियन्ससोबत 5 IPL आणि 2 चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकून या पिढीतील महान खेळाडूंपैकी एक बनला आहे. मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून तो आयपीएलमध्ये राहणार आहे, तर दुबईत होणाऱ्या ट्वेंटी-२० लीगमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या MI Emirates संघाकडून खेळणार आहे. 

दुबईत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० लीगचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर या लीगचे थाटामाटात उद्घाटन होणार आहे. १३ जानेवारी ते १२ फेब्रुवारी, २०२३ या कालाधीत ही लीग खेळवण्यात येणार आहे. अबु धाबी जयेद क्रिकेट स्टेडियमवर १४ जानेवारीला पहिला सामना होणार आहे आणि सलामीचा सामना दुबई कॅपिटल्स विरुद्ध अबुधाबी नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. रिलायन्स ग्रुपच्या मुंबई फ्रँचायझीच्या MI Emirates आणि कॅप्री ग्लोबल्सच्या शारजाह वॉरियर्स यांच्यातल्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. १७ जानेवारीला शारजाह क्रिकेट स्टेडियमवर ही लढत होईल.

 

आकाश अंबानी यांनी सांगितले की, किरॉन पोलार्ड आणि राशिद खान यांच्याकडे अनुक्रमे MI एमिरेट्स व MI केप टाऊन संघाचे कर्णधारपद सोपवण्यात मला आनंद होतोय. 

MI Emirates चे वेळापत्रक

१४ आणि १७ जानेवारी - वि. शारजा वॉरियर्स२१ जानेवारी - वि. नाइट रायडर्स२२ जानेवारी - वि. दुबई कॅपिटल्स२४ जानेवारी - वि. डेजर्ट व्हायपर्स२७ जानेवारी - वि. गल्फ जायंट्स२९ जानेवारी - वि. डेजर्ट व्हायपर्स१ फेब्रुवारी - वि. गल्फ जायंट्स३ फेब्रुवारी - वि. नाइट रायडर्स५ फेब्रुवारी - वि. दुबई कॅपिटल्स

टॅग्स :मुंबई इंडियन्सकिरॉन पोलार्ड
Open in App