मुंबई : आयपीएल आपल्या आगामी 2023च्या हंगामाकडे कूच करत आहे. अलीकडेच नव्या आयपीएल हंगामासाठी आयपीएलचा मिनी लिलाव पार पडला आहे. मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने 2023 च्या हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला 17.25 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. अशातच मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा करत रणशिंग फुंकले आहे.
दरम्यान, सलामीवीर म्हणून फलंदाजी करताना 100 हून अधिक प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव असलेल्या अरूणकुमार जगदीशन यांची मुंबईच्या सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. त्यांनी 1993 ते 2008 अशी 16 वर्षे भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले आहे. निवृत्तीनंतर त्यांनी आपला मोर्चा प्रशिक्षणाकडे वळवला आणि कर्नाटकच्या संघाचे फलंदाजी प्रशिक्षक पद सांभाळले. 2013-14 आणि 2014-15 मध्ये त्यांनी रणजी ट्रॉफी, इराणी चषक आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग विजेतेपद जिंकले.
आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा संघ -
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, जसप्रीत बुमाराह , जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड, डेवॉल्ड ब्रेव्हिस, जसप्रीत बुमराह, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमेरून ग्रीन, झाय रिचर्डसन, राघव गोयल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Mumbai Indians appoint Arun Kumar Jagadeesh as Assistant Batting Coach for 2023 ipl season
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.