Join us

MI नं जॅकी दादाला दिला 'स्पेशल रोल'; मग झाले हार्दिक, सूर्या, बुमराह, तिलकसह रोहितचे 'बारसे'

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून फ्रँचायझीची ही संकल्पना अनेकांना जाम आवडल्याचे दिसून येते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 15:57 IST

Open in App

मुंबई इंडिन्सचा संघ आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी सज्ज झालाय. फ्रँचायझी संघानं सोशल मीडियावरून आगामी हंगामासाठी माहोल निर्माण करायलाही सुरुवात केलीये. हार्दिक पांड्याची ढासू एन्ट्रीनंतर मुंबई इंडियन्स संघानं कर्णधार हार्दिक पांड्यासहरोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या स्टार खेळाडूमधील फोनाफोनीचा एक खास व्हिडिओ शेअर केलाय. यात ही मंडळी नव्या चेहऱ्याची अगदी उत्सुकतेनं वाट पाहत असल्याचे दिसून येते. 

...अन् MI नं जॅकी दादाला केलं कोच, नेमका काय आहे त्याचा रोल 

मुंबई इंडियन्सच्या संघानं यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्याआधी चाहत्यांना खास सरप्राइज दिल्याचे पाहायला मिळते.  बॉलिवूड आयकॉन जॅकी श्रॉफची संघात एन्ट्री झाली आहे. तो 'स्पिरिट कोच'च्या रुपात संघाला जॉईन झालाय. मुंबई इंडियन्सच्या संघानं सोशल मीडियावरून एक खास व्हिडिओ पोस्ट शेअर करत जॅकी दादाची MI च्या ताफ्यातील कडक एन्ट्री खास झलक दाखवलीये.  या नव्या फंड्यासह लोकप्रिय फ्रँचायझी संघानं आपल्या ताफ्यातील फॅब फाइव्हची खास अंदाजात ओळख करून देत ताफ्यासह चाहत्यांमध्ये एक नवा रंग भरल्याचे पाहायला मिळते. 

नवा हंगाम नवा अंदाज, जॅकी दादानं घातलं हार्दिक, सूर्या, बुमराह, तिलकसह रोहितचे 'बारसे'

जॅकी दादाच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सनं आपल्या संघातील 'फॅब फाइव्ह' म्हणजे संघातील पाच स्टार खेळांडूची खास अंदाजात ओळख करून दिलीये.  हार्दिक पांड्या-'भाई', सूर्या-'दादा', बुमराह-'बॉस', तिलक वर्मा- 'बंटी' आणि रोहित शर्मा 'भिडू' असे म्हणत स्पिरिट कोच जॅकी श्रॉफी MI च्या ताफ्यातील स्टार खेळाडूंना नव्या नावा स्पेशल टॅग लावताना दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून फ्रँचायझीची ही संकल्पना अनेकांना जाम आवडल्याचे दिसून येते.    

CSK विरुद्धच्या लढतीनेच करतील यंदाच्या हंगामाची सुरुवात

मुंबई इंडियन्सचा संघाला गत हंगामात लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. यावेळी ती उणीव भरून काढत खांद्याला खांदा लावून ट्रॉफी जिंकणाऱ्या CSK ला मागे टाकण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या लढतीनेच ते यंदाच्या हंगामाची सुरुवात करणार आहेत. 

टॅग्स :मुंबई इंडियन्सरोहित शर्माहार्दिक पांड्याजसप्रित बुमराहतिलक वर्मासूर्यकुमार अशोक यादवजॅकी श्रॉफइंडियन प्रिमियर लीग २०२५