आम्ही इथे संपूर्ण IPL स्पर्धा खेळायला आलोय! जसप्रीत बुमराहच्या विश्रांतीवरुन किरॉन पोलार्डचं उत्तर

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स आयपीएल २०२४ हंगामातील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 05:24 PM2024-05-07T17:24:03+5:302024-05-07T17:24:23+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians assistant coach Kieron Pollard has hinted that the franchise is not thinking of giving rest to premier India pacer Jasprit Bumrah in the remaining matches of IPL. | आम्ही इथे संपूर्ण IPL स्पर्धा खेळायला आलोय! जसप्रीत बुमराहच्या विश्रांतीवरुन किरॉन पोलार्डचं उत्तर

आम्ही इथे संपूर्ण IPL स्पर्धा खेळायला आलोय! जसप्रीत बुमराहच्या विश्रांतीवरुन किरॉन पोलार्डचं उत्तर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सआयपीएल २०२४ हंगामातील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहे. सूर्यकुमार यादवच्या १०२ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर सोमवारी हार्दिक पांड्याच्या संघाने मुंबईतील वानखेडे मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळवला. यानंतर पत्रकार परिषदेत मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्डला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याबाबत विचारण्यात आले, तेव्हा पोलार्डने जोरदार उत्तर दिले. 


मुंबई इंडियन्स १२ सामन्यांत चार विजय आणि ८ पराभवांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे मुंबईसाठी आयपीएल २०२४च्या प्लेऑफचा मार्ग बंद झाला आहे.  जसप्रीत बुमराहने आतापर्यंत मुंबईसाठी सर्व १२ सामने खेळले असून १८ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. मुंबईच्या विजयानंतर पोलार्डने सांगितले की,''आमच्या टीममध्ये या विषयावर कोणतीही चर्चा झालेली नाही आणि ते माझे काम आहे, असे मला वाटत नाही. पण, पुढे काय होते ते पाहू. आम्ही सर्व आता संपूर्ण आयपीएल २०२४ हंगाम खेळण्यासाठी येथे आलो आहोत. आयपीएल पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे आणि त्यानंतरच काय होते ते पाहू.''


हैदराबादविरुद्ध  ५१ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकारांसह १०२ धावांची नाबाद शतकी खेळी करणाऱ्या सूर्यकुमार यादवबाबत पोलार्ड म्हणाला, तो नैसर्गिकरित्या आक्रमक फलंदाज आहे आणि त्याला प्रत्येक चेंडूवर फटके मारायचे असतात. अशा परिस्थितीत, फलंदाजी प्रशिक्षकासाठी सर्वात कठीण काम म्हणजे त्याची नैसर्गिक शैली बदलणे. पण त्याला जास्त नियंत्रणाची गरज नाही कारण सध्याच्या क्रिकेटमध्ये हेच महत्त्वाचे आहे.
 

Web Title: Mumbai Indians assistant coach Kieron Pollard has hinted that the franchise is not thinking of giving rest to premier India pacer Jasprit Bumrah in the remaining matches of IPL.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.