"तुला लाज वाटली पाहिजे..." चुकीच्या बातमीमुळे पत्रकारावर संतापला जोफ्रा आर्चर!

 jofra archer tweet : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 03:53 PM2023-04-26T15:53:00+5:302023-04-26T15:53:21+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians bowler Jofra Archer is furious with journalists for giving wrong news during IPL 2023  | "तुला लाज वाटली पाहिजे..." चुकीच्या बातमीमुळे पत्रकारावर संतापला जोफ्रा आर्चर!

"तुला लाज वाटली पाहिजे..." चुकीच्या बातमीमुळे पत्रकारावर संतापला जोफ्रा आर्चर!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

jofra archer ipl । मुंबई : सध्या आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ अर्थात मुंबई इंडियन्स सध्या संघर्ष करत असून संघाला सातपैकी केवळ तीन सामने जिंकता आले आहेत. आताच्या घडीला रोहित शर्माचा (Rohit Sharma) संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराहच्या (jasprit bumrah) अनुपस्थितीत जोफ्रा आर्चरच्या खांद्यावर मुंबईच्या गोलंदाजीची जबाबदारी होती. पण सलामीचा सामना खेळल्यानंतर पंजाबविरूद्धचा सामना वगळता आर्चर दुखापतीमुळे इतर सामन्यांना मुकला आहे. खरं तर आर्चर शस्त्रक्रियेसाठी बेल्जियमला गेला असल्याचे वृत्त समोर आले आणि यावरून आर्चर चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले. 

टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, आर्चर छोट्या शस्त्रक्रियेसाठी बेल्जियमला गेला होता. मागील २५ महिन्यातील त्याची ही पाचवी शस्त्रक्रिया आहे. त्याच्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली असून याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. याचाच दाखला देत आर्चरने एक ट्विट करून पत्रकाराचा समाचार घेतला आहे. 

जोफा आर्चरने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "खरी परिस्थिती जाणून न घेता आणि माझ्या संमतीशिवाय एखादी बातमी टाकणे म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे. रिपोर्टर, तुला लाज वाटली पाहिजे. एखाद्या खेळाडूसाठी आधीच चिंताजनक आणि त्रासदायक वेळ असताना तुम्ही तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी त्याचा फायदा घेत आहात. ही समस्या तुमच्या सारख्या लोकांमुळेच आणखी वाढते." 

२ सामने खेळून आर्चर बाहेर
जोफ्रा आर्चर मागील शनिवारी पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात खेळला होता. तेव्हा तो पूर्णपणे तंदुरूस्त दिसत होता. त्याने या सामन्यात ४ षटके टाकली, ज्यामध्ये आर्चरने १४५ प्रति तास वेगाने गोलंदाजी केली. लक्षणीय बाब म्हणजे जोफ्रा आर्चर आणखी काही सामने विश्रांती घेण्याची शक्यता आहे. आर्चरसाठी २०२१ हे वर्षे एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिले, कारण त्याला या संपूर्ण वर्षात कोपऱ्याच्या दुखापतीचा सामना करावा लागला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 


 

Web Title: Mumbai Indians bowler Jofra Archer is furious with journalists for giving wrong news during IPL 2023 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.