Ishan Kishan Mumbai Indians IPL Auction 2022: मुंबई इंडियन्सने इशान किशनवर लावली सर्वात महागडी बोली; मिळाला रोहितपेक्षाही जास्त भाव

इशान किशन ठरला रोहित शर्मापेक्षाही महागडा खेळाडू; पाहा किती मिळाली रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 04:48 PM2022-02-12T16:48:17+5:302022-02-12T17:18:15+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians buy Ishan Kishan as most expensive player in History bid more than Rohit Sharma IPL Auction 2022 Updates | Ishan Kishan Mumbai Indians IPL Auction 2022: मुंबई इंडियन्सने इशान किशनवर लावली सर्वात महागडी बोली; मिळाला रोहितपेक्षाही जास्त भाव

Ishan Kishan Mumbai Indians IPL Auction 2022: मुंबई इंडियन्सने इशान किशनवर लावली सर्वात महागडी बोली; मिळाला रोहितपेक्षाही जास्त भाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ishan Kishan Mumbai Indians IPL Auction 2022: मुंबई इंडियन्स संघाकडून आतापर्यंतची IPL इतिहासातील ही सर्वाधिक बोली ठरली. रोहितला मुंबईच्या संघाने आतापर्यंत सर्वाधिक ९ कोटी २० लाख रूपयांत विकत घेतलं होतं. त्याचा विक्रमही इशान किशनने मोडला. इशान किशनवर १५ कोटी ७५ लाखांची बोली लावण्यात आली. मुंबईच्या संघाने पहिल्या सत्रात एकही खेळाडू विकत घेतला नव्हता. त्यावेळीच इशान किशनसाठी मुंबईने मोठी रक्कम राखून ठेवल्याची चर्चा होती. त्यानुसार मुंबईने आपला डाव खेळत इशान किशनला ताफ्यात सामील करून घेतलं.

ठरला भारतीय यष्टीरक्षकांपैकी सर्वात महागडा खेळाडू

इशान किशन हा भारतीय यष्टीरक्षकांच्या यादीतील सर्वात महागडा खेळा़डू ठरला. या आधी चेन्नईच्या संघाने महेंद्रसिंग धोनीला साडेआठ कोटींच्या बोलीवर संघात घेतलं होतं. त्यानंतर कोणत्याही किपरवर इतकी बोली लागली नव्हती. पण इशान किशनचे नाव लिलावासाठी पुकारण्यात आल्यावर मुंबई, पंजाब आणि हैदराबाद या तीन संघांनी बोली लावण्यास सुरूवात केली. त्यातही पंजाबने एका मर्यादेनंतर बोली लावण्यास बंद केलं. त्यानंतर मुंबई आणि हैदराबाद यांच्यात स्पर्धा होती. अखेर मुंबईने यात बाजी मारली.

Web Title: Mumbai Indians buy Ishan Kishan as most expensive player in History bid more than Rohit Sharma IPL Auction 2022 Updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.