Tymal Mills Mumbai Indians, IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'मध्ये नक्की चाललंय तरी काय? टायमल मिल्सने 'ते' ट्वीट केलं डिलीट

मुंबई अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 05:07 PM2022-04-21T17:07:15+5:302022-04-21T17:07:55+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians camp looks something fishy as Tymal Mills deleted the tweet declaring himself fit | Tymal Mills Mumbai Indians, IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'मध्ये नक्की चाललंय तरी काय? टायमल मिल्सने 'ते' ट्वीट केलं डिलीट

Tymal Mills Mumbai Indians, IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'मध्ये नक्की चाललंय तरी काय? टायमल मिल्सने 'ते' ट्वीट केलं डिलीट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Tymal Mills Mumbai Indians, IPL 2022 MI vs CSK: मुंबई इंडियन्स संघाची यंदाच्या हंगामातील वाईट अवस्था प्रत्येक क्रिकेटरसिकाला माहिती आहे. सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळख मिरवणाऱ्या संघाची इतकी लाजिरवाणी अवस्था झाल्याने सारेच हताश आहेत. मुंबईच्या संघाने मेगालिलावातील जवळपास सर्वच खेळाडूंना संघात स्थान देऊन पाहिले, पण अद्याप त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही. परदेशी गोलंदाजांपैकी रेली मेरेडिथ आणि भारतीय गोलंदाजांपैकी अर्जुन तेंडुलकर असे दोनच पर्याय सध्या अजूनपर्यंत संघातून खेळलेले नाहीत. तशातच डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स याच्याबद्दल काही विचित्र घटना घडताना दिसत आहेत.

एका सोशल मीडिया पेजवर टायमल मिल्स हा दुखापतग्रस्त झाला असून तो उर्वरित IPL खेळू शकणार नाही अशी पोस्ट झळकली. या पोस्टनंतर अनेकांनी अनेक तर्कवितर्क लढवले. पण मिल्सने थेट त्या पोस्टचा समाचार घेतला. 'मी एकदम ठणठणीत आहे. तुम्हाला अशी माहिती कुठून आणि कोणी दिली मला माहिती नाही, पण लवकरात लवकर ही दिशाभूल करणारी पोस्ट डिलीट करा. मी फिट आहे', असे ट्वीट त्याने केले होते. त्यामुळे फॅन्स खुश झाले. पण तशातच आता नव्याने मिळालेल्या माहितीनुसार, त्याने स्वत: फिट जाहीर केलेली पोस्ट डिलीट केल्यामुळे गोंधळ अधिकच वाढला आहे.

मिल्सने डिलीट केलेल्या पोस्टमागे मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमधील काही अंतर्गत कलह, वादविवाद आहेत का, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. तसेच, मिल्सच्या जागी संघात धवल कुलकर्णीला समाविष्ट करून घेणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. याशिवाय, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला संघात स्थान मिळण्यासाठीही अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये नक्की काय चाललंय, असा सवाल क्रिकेटचाहत्यांना पडल्याचे दिसतेय.

 

Web Title: Mumbai Indians camp looks something fishy as Tymal Mills deleted the tweet declaring himself fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.