IPL 2024 : अखेर गळाभेट झाली! हार्दिक पांड्या-रोहित शर्मा यांच्यातल्या वादाच्या चर्चांना पूर्णविराम

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 09:22 AM2024-03-21T09:22:42+5:302024-03-21T09:23:18+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians Captain Hardik Pandya hugs former captain Rohit Sharma in first meeting on field ahead of IPL 2024, Watch Video | IPL 2024 : अखेर गळाभेट झाली! हार्दिक पांड्या-रोहित शर्मा यांच्यातल्या वादाच्या चर्चांना पूर्णविराम

IPL 2024 : अखेर गळाभेट झाली! हार्दिक पांड्या-रोहित शर्मा यांच्यातल्या वादाच्या चर्चांना पूर्णविराम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबईच्या फ्रँचायझीने रोहित शर्माकडून नेतृत्व काढून हार्दिककडे सोपवल्यानंतर चाहते प्रचंड संतापले. रोहित या निर्णयाने नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यात हार्दिकनेही पहिल्याच पत्रकार परिषदेत कर्णधार झाल्यानंतर रोहितशी बोलणं झालं नसल्याचे कबुल केले. त्यामुळे नेमकं काहीतरी फिसकटलंय असे चाहत्यांमध्ये ठाम मत झाले. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे कॅम्पही लागले, परंतु त्यातही रोहित-हार्दिक एकत्र दिसले नाही, त्यामुळे चर्चांना वेग पकडला. पण, अखेर बुधवारी मुंबई इंडियन्सचे पोस्ट केलेल्या व्हिडीओतून याचे उत्तर मिळाले.

मुंबई इंडियन्सच्या ट्रेनिंग कॅपचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्यात दोन्ही खेळाडू एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. या व्हिडिओने एक गोष्ट स्पष्ट केली की रोहित आणि हार्दिक हे जुने मित्र आहेत आणि त्यांच्यामध्ये सर्व काही ठीक आहे. हार्दिकने रोहितला पाहताच पुढे येऊन त्याला मिठी मारली. यानंतर दोघेही बराच वेळ एकमेकांशी बोलत होते. 


मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४सीझनच्या आधी अहमदाबादला जाण्यापूर्वी त्यांचा सराव सामना बंद दाराआड  केला होता. मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी सराव सामन्यासाठी उद्दिष्टे मांडली होती आणि खेळाडूंना त्यांच्यात्यांच्या भूमिका समजावून सांगितल्या होत्या.  रोहित शर्मा एका कस्टमाईज प्रशिक्षण कार्यक्रमात असल्याने तेथे तो गेल्या ३ दिवसांपासून सिम्युलेटेड नेट सत्रे, गतिशीलता आणि स्ट्रेंथ व कंडिशनिंग सत्रांमध्ये सहभागी झाला होता.  

मुंबई इंडियन्स - हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, आकाश मढवाल, अंशुक कंबोज, अर्जुन तेंडुलकर, डेवॉल्ड ब्रेव्हिस, दीलशान मदुशंका, गेराल्ड कोएत्झी, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेया, मोहम्मद नबी, नमन धीर, नेहाल वढेरा, नुवान तुशारा, पीयूष चावला, रोमारिओ शेफर्ड, शाम्स मुलानी, शिवलिक शर्मा, श्रेयस गोपाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद

मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक     

२४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
२७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
१ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई

Web Title: Mumbai Indians Captain Hardik Pandya hugs former captain Rohit Sharma in first meeting on field ahead of IPL 2024, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.