Join us  

आला रे आला... Rohit Sharma आला!; IPL 2022 साठी Mumbai Indiansच्या 'हिटमॅन'ची तयारी पाहून प्रतिस्पर्धींना घाम फुटला,Video 

मुंबई इंडियन्सचा पहिला मुकाबला 27 मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्सने तयारीला सुरुवात केली आहे आणि रोहितने नेट्समध्ये तुफान फटकेबाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 5:55 PM

Open in App

Rohit Sharma kicks off preparations for IPL 2022 - राष्ट्रीय कर्तव्यानंतर भारतीय खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वासाठी आपापल्या फ्रँचायझीच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकून कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma), जसप्रीत बुमराह हे मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) ताफ्यात, विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ताफ्यात दाखल झाला. तीन दिवसांच्या क्वारंटाइननंतर आज रोहितने सरावाला सुरुवात केली आणि त्याची फटकेबाजी पाहून प्रतिस्पर्धींनी आयपीएल 2022 सुरू होण्याआधीच घाम फुटला आहे.

मुंबई इंडियन्सचा पहिला मुकाबला 27 मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्सने तयारीला सुरुवात केली आहे आणि रोहितने नेट्समध्ये तुफान फटकेबाजी केली. MIने त्याच्या फटकेबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. आयपीएल 2022च्या साखळी फेरीचे सामने महाराष्ट्रात खेळवण्यात येणार आहेत. मुंबई इंडियन्सला A गटात स्थान दिले गेले असून त्यांच्यासोबत दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे या गटात आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता, राजस्थान, दिल्ली, लखनौ व चेन्नई यांच्याशी दोनवेळा भिडणार, तर हैदराबाद, बंगळुरू, पंजाब व गुजरात यांच्याविरुद्ध एकच सामना खेळणार आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये सर्वाधिक 15.25 कोटी रुपये मोजून इशान किशनला आपल्या ताफ्यात पुन्हा घेतले. तो रोहितसह सलामीला खेळणार आहे. इशानने आयपीएलच्या 61 सामन्यांत 1452 धावा केल्या आहेत. त्यानंतर त्यांनी जोफ्रा आर्चरसाठी सर्वाधिक 8 कोटी मोजले, परंतु इंग्लंडचा गोलंदाज दुखापतीमुळे यंदाच्या पर्वात खेळणार नाही.   

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्मामुंबई इंडियन्स
Open in App