इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या तयारीला सर्व खेळाडू लागले आहेत. मुंबई इंडियन्सचाहा कॅम्प सुरू झाला आहे आणि त्यात कर्णधार रोहित शर्मा व स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांसाठी फ्रँचायझीने खास सुविधा केली आहे. मुंबई इंडियन्सने MI Campचा खास व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्यात कर्णधार रोहित सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याच्याशी मराठीतून संवाद साधताना दिसतोय. पण, या संभाषणाची सुरुवात रोहितने अर्जुनची ओळख 'The one and only' अशी करून देत शाळा घेतली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकून भारतीय खेळाडू आयपीएलसाठी आपापल्या फ्रँचायझीच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. रोहित व जसप्रीतही मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये दाखल झाले. मुंबई इंडियन्सने त्यांच्या YouTube चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात रोहित व अर्जुन गप्पा मारताना दिसत आहेत. यावेळी रोहितने खेळाडूंची ओळख करून देताना अर्जुनसाठी 'The one and only' हा शब्द वापरला. त्यानंतर रोहितने मराठीतून अर्जुनची व तेंडुलकर कुटुंबीयांची विचारपूस केली. आयपीएलच्या १५व्या पर्वासाठी मुंबई इंडियन्सने अर्जुनला पुन्हा करारबद्ध केले आहे.
आयपीएल २०२१पासून अर्जुन MI Family चा सदस्य आहे. आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनमध्ये MI ने ३० लाखांत अर्जुनला करारब्ध केले. २० लाखांच्या मुळ किंमतीत अर्जुनला स्थान मिळाले होते अन् त्याचे नाव येताच लखनौ सुपर जायंट्सने ऑक्शन पॅडल उचलला. त्यामुळे त्याची किंमत १० लाखाने वाढली. अर्जुनला अजूनही MI कडून पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
पाहा व्हिडीओ...