Join us  

है तैयार हम! कॅप्टन रोहित विरूद्ध आर्चर रंगला 'सामना', पहिल्या लढतीपूर्वी 'मुंबई'ने फुंकले रणशिंग

mumbai indians team 2023 : आजपासून आयपीएलच्या १६व्या हंगामाची सुरूवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 4:49 PM

Open in App

jofra archer ipl 2023 । मुंबई : जगातील सर्वात मोठी ट्वेंटी-२० लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग (IPL) आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आजपासून आयपीएलच्या १६व्या हंगामाची सुरूवात होत आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत खेळणार आहे. २ एप्रिलला होणाऱ्या या सामन्यासाठी सराव करताना मुंबईच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मानेजोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीचा सामना केला. खरं तर जोफ्रा आर्चर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे.

दरम्यान, मागील वर्षी दुखापतीमुळे आर्चरने आयपीएलमधून माघार घेतली होती. पण ८ कोटी रूपयांमध्ये खरेदी केलेला आर्चर या हंगामात फलंदाजांना घाम फोडण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईच्या गोलंदाजीची धुरा आर्चरच्या खांद्यावर असणार आहे. आपल्या पहिल्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने आर्चरच्या गोलंदाजीवर सराव केला, ज्याचा व्हिडीओ फ्रँचायझीने शेअर केला आहे. 

जोफ्रा विरूद्ध रोहित 

आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड. डेवॉल्ड ब्रेव्हिस, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमेरून ग्रीन, झाय रिचर्डसन, राघव गोयल, संदीप वॉरियर. 

IPL २०२३ साठी मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक - 

  1. २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू - सायंकाळी ७.३० वा. पासून 
  2. ८ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा. पासून
  3. ११ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली - सायंकाळी ७.३० वा. पासून 
  4. १६ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई - दुपारी ३.३० वा.पासून 
  5. १८ एप्रिल - स नरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद  - सायंकाळी ७.३० वा.पासून
  6. २२ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, मुंबई  - सायंकाळी ७.३० वा.पासून
  7. २५ एप्रिल- गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, अहमदाबाद  - सायंकाळी ७.३० वा.पासून
  8. ३० एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  9. ३ मे - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, मोहाली  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  10. ६ मे - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई - दुपारी ३.३० वा. पासून 
  11. ९ मे - मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई  - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  12. १२ मे - मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  13. १६ मे - लखनौ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स लखनौ, - सायंकाळी ७.३० वा.पासून 
  14. २१ मे - मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई - दुपारी  ३.३० वा.पासून  

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :मुंबई इंडियन्सजोफ्रा आर्चररोहित शर्मारॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल २०२३
Open in App