MI vs SRH Live Match । मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ 'करा किंवा मरा'चा सामना सनरायझर्स हैदराबादविरूद्ध खेळत आहे. आजचा सामना मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा असून आजचा विजय संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवू शकतो. मुंबईचा संघ आताच्या घडीला १४ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानी स्थित आहे, तर आरसीबी (१४) आणि राजस्थान रॉयल्सचा संघ (१४) गुणांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. खरं तर राजस्थानच्या संघाने आपले १४ सामने खेळले आहेत, त्यामुळे आरआरचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.
आजच्या सामन्यासाठी रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाच्या सामन्यासाठी मुंबईच्या संघात एक बदल करण्यात आला असून ऋतिक शौकिनच्या जागी कुमार कार्तिकेयला संधी मिळाली आहे. आम्ही आजचा सामना जिंकण्यावर भर देत आहोत. बाकीची समीकरणे काय आहेत याकडे फारसे लक्ष न देता चांगले क्रिकेट खेळू, असे कर्णधार रोहितने नाणेफेकीवेळी सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे तिलक वर्मा आज इम्पॅक्ट प्लेयरच्या रूपात खेळणार आहे.
दरम्यान, मुंबईला आजच्या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पराभवाची देखील अपेक्षा करावी लागू शकते. लक्षणीय बाब म्हणजे आता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू त्यांचा अखेरचा साखळी सामना जिंकून प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. पण, RCB चा रन रेट ०.१८० असा आहे आणि MI चा -०.१२८ असा आहे. त्यामुळे मुंबईला आज SRHवर मोठा विजय मिळवाला लागेल आणि त्याचवेळी RCBचा GTकडून पराभवाची वाट पाहावी लागेल. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज दुसरा सामना होणार आहे.