Mumbai Indians Win Record, IPL 2024 MI vs DC: मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदाच्या स्पर्धेत अखेर रविवारी पहिला विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्स संघा विरूद्ध मुंबईने मोठी धावसंख्या उभारली आणि त्याचा बचाव करण्यात मुंबईकर गोलंदाजांना यश आले. मुंबई इंडियन्सच्यारोहित शर्मा, टीम डेव्हिड आणि इशान किशन यांनी तुफान फटकेबाजी केली. पण रोमारियो शेपर्डने त्यावर कळस चढवला. शेवटच्या षटकात ३२ धावा करत त्याने मुंबईला २३४ पर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात दिल्लीचा डाव मात्र २०५ धावांपर्यंत पोहोचू शकला. त्रिस्टन स्टब्सने २५ चेंडूत सर्वाधिक नाबाद ७१ धावा कुटल्या, पण त्याचा संघर्ष दिल्लीला विजय मिळवून देऊ शकला नाही. मुंबई इंडियन्सने हा सामना २९ धावांनी जिंकत टी२० क्रिकेटमध्ये एक खास विक्रम आपल्या नावे केला.
मुंबई इंडियन्सने केला कुणालाही न जमलेला विक्रम
मुंबई इंडियन्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल च्या पराभव करून यंदाच्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला हा विजय अनेक कारणांनी महत्त्वाचा आणि विशेष ठरला हार्दिक पांड्या मुंबईच्या कर्णधार झाल्यानंतर हा मुंबईचा पहिलाच विजय होता त्यामुळे या मुलीच्या हार्दिक पांड्यासाठी वेगळाच आनंद होता पण त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे हा विजय विशेष अर्थाने महत्त्वाचा ठरला मुंबई इंडियन्सने टी-ट्वेंटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक 150 क्रिकेट सामने जिंकण्याचा विक्रम केला आतापर्यंत कोणत्याही एका संघाने 150 टी-20 सामने जिंकण्यापर्यंत मजल मारलेली नाही या यादीत 148 विजयांसह चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या स्थानी तर भारतीय क्रिकेट संघ म्हणजेच टीम इंडिया 144 विजयांसह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.
सामन्याआधी हार्दिकने केला होता सोमनाथ मंदिरात दुग्धाभिषेक
चाहत्यांकडून होत असलेली टीका, सामन्यात पदरी पडत असलेला पराभव आणि खचत असलेले मनोबल या सर्वांवर मात करण्यासाठी हार्दिकने मंदिरात जाऊन पूजा-अर्चना केली होती. हार्दिकने गुजरातमधील सोमनाथ मंदिरात दुग्धाभिषेक केला होता. मंत्रोच्चार आणि विधीवत पूजाही केली होती. हार्दिकने सोमनाथ शिवलिंगाचे दर्शन घेतले होते आणि संघाचा फॉर्म परत यावा यासाठी प्रार्थना केली होती. त्यामुळे मुंबईच्या पहिल्या विजयानंतर हार्दिकला 'देव पावला' असेच चाहत्यांकडून बोलले जात आहे.