Join us  

Mumbai Indians, Dewald Brevis : १५ चेंडूंत चोपल्या ७८ धावा; ज्याचा खेळ पाहून सारा झाली होती इम्प्रेस त्या डेवॉल्ड ब्रेव्हिसचे शतक, मुंबई इंडियन्सचा विजय

महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकर ही पण ब्रेव्हीसला खेळ पाहून इम्प्रेस झालेली वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात सर्वांना पाहिले. त्याच ब्रेव्हिसने पुन्हा एकदा मुंबई इंडियन्ससाठी शतकी खेळी केली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 7:42 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. नव्यानं संघंबांधणी केल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात काही उणीवा प्रकर्षाने जाणवल्या. पण, त्याचवेळी टीम डेव्हिड व डेवॉल्ड ब्रेव्हिस ( Dewald Brevis) हे दोन स्टार MI ला सापडले. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकर ही पण ब्रेव्हीसला खेळ पाहून इम्प्रेस झालेली वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात सर्वांना पाहिले. त्याच ब्रेव्हिसने पुन्हा एकदा मुंबई इंडियन्ससाठी शतकी खेळी केली.

वेस्ट इंडिजमध्ये पार पडलेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा 'Baby AB' ब्रेव्हिसने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आणि मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. मुंबई इंडियन्सच्या दुसऱ्या फळीचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि डरहॅम क्रिकेट क्लबविरुद्ध त्यांनी २० षटकांत ९ बाद २११ धावा चोपल्या. ब्रेव्हिस या सामन्यात स्टार ठरला. त्याने ४९ चेंडूंत ११२ धावांची खेळी करताना  ६ चौकार व ९ षटकारांची आतषबाजी केली.  आरएस गहलौतसोबत तो सलामीला आला होता. गहलोटने २५ धावा केल्या. या सामन्यात त्रिस्तान स्टुब्ब्स, हृतिक शोकिन, मयांक मार्कंडे आणि अर्जुन तेंडुलकर हेही खेळले. एल डोनेथीने २१ धावांत ३ विकेट्स गेतल्या.  

ब्रेव्हिसने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप  स्पर्धेत ८४.३३ च्या सरासरीने ५०६ धावा केल्या आणि २८.५७ च्या सरासरीने ७ विकेट्स घेतल्या. आयपीएल २०२२ साठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी ३ कोटी रुपये मोजले. आयपीएल २०२२मध्ये त्याने १४२.४८च्या स्ट्राईक रेटने १६१ धावा केल्या. पंजाब किंग्सविरुद्ध २५ चेंडूंत ४९ धावांची खेळी ही उल्लेखनीय ठरली. त्याने राहुल चहरच्या एका षटकात ४, ६, ६, आणि ६ अशा धावा कुटल्या होत्या.    

टॅग्स :मुंबई इंडियन्ससारा तेंडुलकर
Open in App