नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलसोबतच टी-२० विश्वचषकातही आपली छाप सोडली आहे. विश्वचषकासाठी निवड करण्यात आलेल्या १५ सदस्यांच्या संघात मुंबई इंडियन्सच्या ६ खेळाडूंना स्थान मिळाले. त्यात कर्णधार रोहित शर्मासोबतच सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, ईशान किशन आणि राहुल चहरचा समावेश आहे. विश्वचषकाचे आयोजन १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये होईल. त्याआधी १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने यूएईतच होतील.
रोहितने आपल्या नेतृत्वामध्ये सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले आहे. या संघातील सर्वाधिक खेळाडू भारतीय संघात असल्याने त्याचा संघाला फायदा होणार आहे. शार्दुल आणि श्रेयस अय्यर या मुंबईकर खेळाडूंना राखीव फळीत स्थान मिळाले.मुंबईपाठोपाठ दिल्ली कॅपिटल्सचे तीन खेळाडू ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांना संघात स्थान देण्यात आले. पंजाब किंग्सचे लोकेश राहुल आणि मोहम्मद शमी संघात आहेत. आरसीबी, सीएसके, केकेआर आणि सनरायजर्सचा प्रत्येकी एक खेळाडू राष्ट्रीय संघात आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा विराट कोहली, चेन्नई सुपर किंग्सचा रवींद्र जडेजा, कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती आणि सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हे संघात आहेत.
रोहितला जाते श्रेय...रोहित शर्माने स्वत:च्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपद मिळवून दिले. याचा अर्थ त्याने संघ बांधणी केली शिवाय संघाने देखील त्याच्या नेतृत्वाला आकार दिला. नेतृत्वक्षमता आणि मेहनतीच्या बळावर रोहितने प्रत्येक खेळाडूमध्ये विजयाची भूक निर्माण केली.
कोणाचे किती खेळाडूमुंबई इंडियन्स ६दिल्ली कॅपिटल्स ३पंजाब किंग्स २आरसीबी १सीएसके १केकेआर १सनरायजर्स हैदराबाद १