Join us  

'मुंबई इंडियन्स'कडून खेळलेला स्टार खेळाडू आता USAच्या संघात, T20 World Cup खेळण्यास सज्ज

अमेरिकने आगामी T20 मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात या खेळाडूला स्थान दिले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 4:12 PM

Open in App

IPL 2014 मधील मुंबई आणि राजस्थान यांच्यातील सामना क्रिकेटप्रेमी कधीच विसरणार नाही. त्या सामन्यात मुंबईला प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होण्यासाठी १४.४ षटकांत १९० धावांचा टप्पा ओलांडायचा होता. आदित्य तरे याने १४व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार खेचत मुंबईला प्ले ऑफसाठी क्वालिफाय करून दिले होते. या सामन्यात मॅचविनिंग खेळी करणारा खेळाडू होता, न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसन. Corey Anderson ने ४४ चेंडूत नाबाद ९५ धावा केल्या होत्या. आता हाच अँडरसन आगामी टी२० मालिकेत यूएसए म्हणजे अमेरिकेच्या संघाकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच तो अमेरिकेच्या संघातूनच T20 World Cup खेळणार हेदेखील जवळपास निश्चित आहे.

अँडरसन संघात, पण भारताच्या उन्मुक्त चंदला स्थान नाही

कॅनडाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी अँडरसनला यूएसए संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने २०१८ मध्ये न्यूझीलंडसाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर आता सहा वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. भारताचा अंडर-19 माजी कर्णधार उन्मुक्त चंद याला संघातून वगळण्यात आले आहे. टीम इंडियात संधी मिळत नसल्याने उन्मुक्त चंद अमेरिकेत आपली क्रिकेट कारकीर्द घडवण्यासाठी गेला होता. पण सध्या तरी त्याच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत. MLCमध्ये चांगली कामगिरी करूनही यूएसए संघाने उन्मुक्त चंदला संघात स्थान दिलेले नाही.

खरे पाहत, ४५ डावांमध्ये १५००हून अधिक धावा करुन, चंद स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्यात अव्वल स्थानावर आहे. पण कॅनडा विरुद्धच्या मालिकेत त्याला संघाबाहेर ठेवण्यात आल्यामुळे आगामी T20 World Cup साठी त्याला संघात स्थान मिळणे कठीणच वाटत आहे.

यूएसएचा संघ- मोनांक पटेल (कर्णधार), एरोन जोन्स (उपकर्णधार), कोरी अँडरसन, गजानंद सिंग, जेस्सी सिंग, सौरभ नेत्रवलकर, निसर्ग पटेल, स्टीवन टेलर, अँड्रीज गौज, हरमीत सिंग, शॅडली वान शॅल्कविक, नोस्टुश केनजिगे, मिलिंद कुमार, नीतीश कुमार, उस्मान रफीक

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल २०२४न्यूझीलंडट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024अमेरिकाअमेरिका