T20 Vitality Blast: इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी-20 ब्लास्टमधील एसेक्स आणि मिडलसेक्स यांच्यात खेळण्यात आलेल्या सामन्यात एसेक्सने शानदार विजयाची नोंद केली. त्यांनी डकवर्थ पद्धतीने मिडलसेक्सचा 22 धावांनी पराभव केला. या सामन्यात एसेक्सचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्सने (Danial Sams) 24 चेंडूत 67 धावा केल्या. त्यामुळे एसेक्सने विजय मिळवला. डॅनियल सॅम्स हा लखनौ सुपरजायंट्सच्या आयपीएल संघाचा भाग होता. पण डॅनियल सॅम्सला संधी मिळाली नाही. पण या सामन्यात मात्र त्याने दमदार अर्धशतक ठोकत सामना जिंकवला.
डॅनियल सॅम्स हा आयपीएलमधील लखनौ सुपरजायंट्सचा भाग आहे. पण यावर्षी लखनौमध्ये त्याला एकाही सामन्यात संधी देण्यात आली नाही. तो सर्व सामन्यांमध्ये बाहेर बसला. लखनौपूर्वी तो मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. या मोसमात इंग्लंड टी-20 ब्लास्टमध्ये एसेक्ससाठी सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 176 च्या स्ट्राईक रेटने एकूण 228 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने आतापर्यंत 15 षटकार मारले आहेत.
डॅनियल सॅम्सने आतापर्यंत एसेक्ससाठी 3 अर्धशतक ठोकले आहेत. डॅनियल सॅम फलंदाजीला आला तेव्हा संघाची धावसंख्या १४९ धावा होती. त्यावेळी 4 विकेट पडल्या होत्या. सॅमने येताच चौकार आणि षटकारांचा वर्षाव सुरू केला. सॅमशिवाय इतर अनेक फलंदाजांनीही उत्कृष्ट खेळी खेळल्या. सलामीवीर डॅन लॉरेन्सने 30 चेंडूत 53 धावा केल्या. मायकेल पेपरने एकूण 64 धावा केल्या.
दरम्यान, डॅनियल सॅम्सने आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ 10 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने 7 डावात फलंदाजी करताना 106 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 41 होती. डॅनियल सायम्सने आयपीएल मध्ये 16 सामन्यात 44 धावा केल्या आहेत. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आणि IPLमधील 16 सामन्यांमध्ये 14 बळी घेतले. तो आतापर्यंत एकही कसोटी किंवा वनडे खेळलेला नाही.