Jofra Archer, Mumbai Indians: किम्बर्ली येथे बुधवारी खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वन डे सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा ५९ धावांनी पराभव केला. जोफ्रा आर्चरनेही या सामन्यात पुनरागमन केले. इंग्लंडने आपला पाच सामन्यातील पराभवाचा सिलसिला खंडित केला आणि आर्चरने सर्वात धोकादायक गोलंदाज हे बिरूद पुन्हा एकदा सार्थ ठरवलं. या मैदानावर इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारली आणि प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ३४६ धावा केल्या. ३४७ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ २८७ धावांवर गडगडला. या पराभवानंतरही दक्षिण आफ्रिकेने मालिका २-१ ने जिंकली. पण या सामन्याने मुंबई इंडियन्सचे फॅन्स भलतेच खुश झाले.
३४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली पण ४९ धावांवर मागील सामन्याचा शतकवीर आणि संघाचा कर्णधार टेंबा बावुमा ३५ धावा करून बाद झाला. यानंतर रासी व्हॅन डर ड्युसेनही ५ धावा करून बाद झाला. यानंतर जोफ्रा आर्चरची शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याने एकाही आफ्रिकन फलंदाजाला जास्त काळ टिकू दिले नाही आणि १७४ धावांपर्यंत अर्ध्या संघाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आदिल रशीद आणि जोफ्रा आर्चर यांनी मिळून दक्षिण आफ्रिकेला २४७ धावांवरच गारद केले. आर्चरने ९.१ षटकांत ४० धावा देत ६ बळी तर रशिदने ३ आणि ख्रिस वोक्सने एक विकेट घेतली.
त्याआधी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची सुरुवात खराब झाली आणि त्यांचे तीन फलंदाज १४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर डेव्हिड मलान आणि जोस बटलर यांच्यात २३२ धावांची भागीदारी झाली. दोघांनी आपापली शतके पूर्ण केली. अखेरच्या षटकात मोईन अलीने धडाकेबाज खेळी करत संघाला ३४६ पर्यंत पोहोचवले. डेव्हिड मलानने ११८ धावांची खेळी खेळली, ज्यात ७ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता, तर बटलरने १३१ धावा केल्या. बटलरने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ७ षटकार मारले. मोईन अलीने २३ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ४१ धावांची खेळी केली.
Web Title: Mumbai Indians Fans happy as Jofra Archer takes 6 wickets on his comeback ENG vs SA ODI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.