IPL 2022 : Mumbai Indiansचे चाहते आज दुःखी झाले असतील; हार्दिक पांड्याने जेतेपद पटकावल्यानंतर जडेजाचं विधान

कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचे हे पहिलेच जेतपद असले तरी त्याचे हे पाचवे आयपीएल जेतेपद आहे. या विजयासह  सर्वात कमी सामन्यांत आयपीएल जेतेपद जिंकणारा हार्दिक हा दुसरा कर्णधार ठरला. हा विक्रम रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नावावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 04:15 PM2022-05-31T16:15:14+5:302022-05-31T16:15:35+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians fans will be feeling the pain today: Ajay Jadeja on Hardik Pandya's IPL 2022 title triumph | IPL 2022 : Mumbai Indiansचे चाहते आज दुःखी झाले असतील; हार्दिक पांड्याने जेतेपद पटकावल्यानंतर जडेजाचं विधान

IPL 2022 : Mumbai Indiansचे चाहते आज दुःखी झाले असतील; हार्दिक पांड्याने जेतेपद पटकावल्यानंतर जडेजाचं विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन्स प्रीमिअर लीग २०२२ मधून हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) एक दमदार कर्णधार म्हणून जगासमोर आला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने पदार्पणातच आयपीएल २०२२चे जेतेपद नावावर केले. अंतिम सामन्यात त्यांनी राजस्थान रॉयल्सवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. त्यामुळे हार्दिकच्या कामगिरीवर व विशेषतः नेतृत्व कौशल्यावर सुनील गावस्कर पासून ते मायकल वॉनपर्यंत सारेच कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. हार्दिकची हा करिष्मा पाहून मुंबई इंडियन्सचे फ‌ॅन्स सर्वाधिक दुःखी झाले असतील असे विधान माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याने केलं आहे.  

गुजरात टायटन्सची राजेशाही मिरवणूक, मुख्यमंत्र्यांकडून सत्कार

रोहित, महेंद्रसिंग धोनी व गौतम गंभीर यांच्यानंतर हार्दिक हा आयपीएल जेतेपद पटकावणारा चौथा कर्णधार आहे. त्याने २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली मुंबई इंडियन्सचा खेळाडू म्हणून जेतेपदाचा चषक उंचावला होता अन् २०२२मध्ये त्याने कर्णधार म्हणून ही कामगिरी केली. रोहितच्या नावावर ५ जेतेपदं आहेत, किरॉन पोलार्ड, अंबाती रायुडू यांच्याही नावावर प्रत्येकी ५ जेतेपदं आहेत. महेंद्रसिंग धोनी व लसिथ मलिंगा यांनी प्रत्येकी ४ वेळा ही कामगिरी केली आहे. 

आयपीएल २०२१पर्यंत हार्दिक हा मुंबई इंडियन्सचा सदस्य होता, परंतु आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनपूर्वी MI ने त्याला रिटेन केले नाही. त्याच्याएवजी किरॉन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह व रोहित शर्मा यांना रिटेन केले. हार्दिकची तंदुरुस्ती व फॉर्म यावरून मुंबई इंडियन्सने त्याच्या मॅच विनिंग कामगिरीवर शंका उपस्थित केली. पण, त्यानेच आज सर्व टीकाकारांना गप्प केले. अजय जडेजा म्हणाला,''हार्दिक पांड्याची कामगिरी पाहून प्रेक्षकांना अधिक प्रेरणा मिळाली असेल. त्याला चाहत्यांनी डोक्यावर उचलून घेतले. जर कोणाला दुःख झाले असेल, तर ते मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना. गुजरातच्या जेतेपदानंतर हे दुःख अजून वाढले असेल.''

Sachin Tendulkar Best XI of IPL 2022 : ना विराट कोहली, ना रोहित शर्मा; सचिन तेंडुलकरच्या आयपीएल २०२२ संघात दोन सप्राईज पॅकेज!

जडेजा पुढे म्हणाला,''विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी व रोहित शर्मा या तिघांकडून हार्दिकने सर्वोत्तम तेच घेतले. अनुभव तुम्हाला नेहमी शिकवत असतो. मुंबई इंडियन्सकडून तो भरपूर शिकला. बडोदा मधून तो आला, परंतु मुंबई इंडियन्सने  हार्दिक पांड्याला घडवले. आज जो हार्दिक पाहतोय, तो मुंबई इंडियन्समुळे. त्याचं त्याने आभार मानायला हवे.''  

Web Title: Mumbai Indians fans will be feeling the pain today: Ajay Jadeja on Hardik Pandya's IPL 2022 title triumph

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.