harmanpreet kaur mumbai indians | मुंबई : महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. या लिलावात एकूण 5 फ्रँचायझी रिंगणात असून 409 खेळाडूंवर बोली लावली जात आहे. BCCI ने WPL 2023च्या लिलावासाठी 409 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यासाठी एकूण 1525 खेळाडूंनी नोंदणी केली होती. महिला प्रीमियर लीगचा (WPL) पहिला हंगाम 4 ते 26 मार्च दरम्यान पार पडणार आहे. स्मृती मानधनाला आरसीबीच्या फ्रँचायझीने विक्रमी बोली लावून खरेदी केले. भारताच्या विश्वविजेत्या संघाची कर्णधार शेफाली वर्मा हिला दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीने खरेदी केले आहे. तर भारताच्या वरिष्ठ संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने 1.80 कोटी रूपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले.
दरम्यान, लिलावात प्रत्येक फ्रँचायझी खेळाडूंवर 12 कोटी रूपये खर्च करू शकते. किमान 15 आणि जास्तीत जास्त 18 खेळाडूंना खरेदी करण्याची मुभा आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमा रॉड्रिग्स आणि रेणुका सिंग 50 लाख रूपयांच्या मूळ किमतीसह लिलावाच्या रिंगणात होत्या. लक्षणीय बाब म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीने मराठमोळ्या स्मृती मानधनाला 3.40 कोटी रूपयांमध्ये खरेदी केले. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबईच्या फ्रँचायझीने 1.80 कोटी रूपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. खरं तर हरमनप्रीत कौर हिच्यासाठी मोठी बोली लागली जाईल अशी अपेक्षा होती. RCB आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी एक कोटीपर्यंत तिच्यासाठी बोली लावली. पण, 1.10 कोटी होताच मुंबई इंडियन्सने एन्ट्री घेतली. मुंबईने 1.80 कोटींत तिला आपल्या संघात घेतले.
- -WPL च्या लिलावात केवळ 90 खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
- - प्रत्येक संघाला 18 खेळाडूंचीच निवड करता येणार आहे, 150 खेळाडूंचा एक संच असणार आहे.
- -50, 40 व 20 लाख अशा तीन बेस प्राईज ( मुळ किंमत) ठेवण्यात आल्या आहेत. अनकॅप्ड खेळाडूसाठी 10 ते 20 लाखांची बेस प्राईज ठेवली जाईल.
- -लिलावासाठी एकूण 1525 खेळाडूंनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी 409 खेळाडूंची निवड केली गेली.
- - यामध्ये 246 भारतीय आणि 163 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे, ज्यात संलग्न संघटनेचे 8 खेळाडूही आहेत.
मुंबई इंडियन्सच्या फ्रॅंचायझीने 1.80 कोटी रूपयांमध्ये खरेदी केल्यानंतर हरमनप्रीत कौरने म्हटले, "मुंबई इंडियन्सचा पुरूष संघ शानदार कामगिरी आहे. आम्ही देखील तेच करण्याचा प्रयत्न करू. आताच्या घडीला खूप दबाव आहे, पण मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी आतुर देखील आहे. महिला क्रिकेट केवळ भारतातच नाहीतर जगभरात बदलत आहे. मला आशा आहे की मुंबईचे चाहते आम्हाला खूप पाठिंबा देतील."
मुंबईच्या संघाने आतापर्यंत खरेदी केलेले खेळाडू -
- तानिया भाटिया - 30 लाख
- पूजा वस्त्राकर - 50 लाख
- Natalie sciver-brunt - 3.2 कोटी
- अमेलिया किर - 1 कोटी
- हरमनप्रीत कौर - 1.80 कोटी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"