Dewald Brevis Smashes A Massive Six SA20 2025 : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या फ्रँचायझी टी-२० लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझी संघानं हवा केलीये. पहिल्यांदाचा MI केप टाउनचा संघ फायनलमध्ये पोहचलाय. एमआय केप टाउन विरुद्ध पार्ल रॉयल्स विरुद्धच्या क्वालिफायर लढतीत 'बेबी एबी डिव्हिलियर्स' नावाने लोकप्रिय असलेल्या डेवाल्ड ब्रेविस यानेही आपल्या फटकेबाजीचा खास अंदाज दाखवून दिला. MI फ्रँचायझी संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ३० चेंडूत नाबाद ४४ धावांची खेळी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी बॅकफूटवर गेला अन् मग फ्रंटफूटला येत मारला उत्तुंग फटका
या सामन्यात २१ वर्षीय फलंदाजानं अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमान याच्या गोलंदाजीवर मारलेला फटका एदमच लाजवाब होता. या फटक्यावर त्याला सहा धावा मिळाल्या. क्रिकेटच्या मैदानात उत्तुंग षटकार पाहायला मिळणं ही काही तशी नवी गोष्ट नाही. पण डेवाल्ड ब्रेविसनं छतावर मारलेल्या सिक्सरची खासियात एकदम झक्कास होती. त्याने आधी बॅकफूट अन् मग फ्रंटफूटवर येऊन तो ज्या प्रकारे चेंडूवर तुटून पडलाय तो सीन पुन्हा पुन्हा बघण्याजोगा आहे.
...अन् चेंडू थेट छतावर जाऊन पडला
MI केप टाउनच्या डावातील १८ व्या षटकात पार्ल रॉयल्सकडून मुजीब गोलंदाजी करत होता. त्याने या षटकातील चौथा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर अगदी फुल लेंथवर टाकला. हा चेंडू खेळताना ब्रेविसनं कमालीच्या स्टेप्स घेतल्या. आधी तो एक स्टेप बॅकफूवर गेला. त्यानंतर दोन स्टेप्स फ्रंटफूटला येऊन त्याने परफेक्ट फटका खेळला. जो थेट स्टेडियमच्या छतावर जाऊन पडला.
दोन्ही स्टेप एकदम परेफक्ट अन् कमालीचा समतोल दाखवून देणाऱ्या
क्रिकेटच्या मैदानात सर्वोत्तम बॅटिंगसाठी फ्रँटफूट अन् बॅकफूटवर खेळ सर्वोत्तम ठेवावा लागतो. या २१ वर्षीय पठ्यानं एकाच चेंडूवर दोन्ही गोष्टीत एकदम परफेक्ट असल्याचा सीन दाखवून देत एक खास नजराणाच पेश केल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या या स्टेप्समुळे त्याने खेळलेला फटका अधिक खास अन् चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याच्या लाजवाब फटकेबाजीचा व्हिडिओ व्हायर होताना दिसतोय.
Web Title: Mumbai Indians Franchise MI Cape Town Star Dewald Brevis Smashes A Massive Six SA20 2025 Video Goes Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.