"चैन से सोना है तो जाग जाओ", 'सूर्या'नं नेमकं काय केलं? तिलक वर्माची उडाली झोप

tilak varma and surya kumar yadav : मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा दारूण पराभव करून फायनलच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 04:37 PM2023-05-25T16:37:55+5:302023-05-25T16:38:33+5:30

whatsapp join usJoin us
 Mumbai Indians franchise shared a funny video of Suryakumar Yadav and Tilak Verma | "चैन से सोना है तो जाग जाओ", 'सूर्या'नं नेमकं काय केलं? तिलक वर्माची उडाली झोप

"चैन से सोना है तो जाग जाओ", 'सूर्या'नं नेमकं काय केलं? तिलक वर्माची उडाली झोप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

LSG vs MI : मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा दारूण पराभव करून फायनलच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी रोहितसेनेसमोर गतविजेत्या गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे. शुक्रवारी मुंबई आणि गुजरात यांच्यात सामना होणार असून यातील विजयी संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. काल झालेल्या सामन्यात मुंबईने ऐतिहासिक विजय मिळवत लखनौला बाहेरचा रस्ता दाखवला. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मुंबई इंडियन्सने लखनौला पराभूत केले. ८१ धावांनी मोठा विजय मिळवून मुंबईने फायनलकडे कूच केली आहे.

काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने शानदार कामगिरी केली. सांघिक खेळीच्या जोरावर संघाने निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १८२ धावा केल्या. १८३ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौच्या फलंदाजांना घाम फुटला. मुंबईचा आकाश मधवाल लखनौच्या नवाबांसाठी काळ ठरला. त्याने ३.३ षटकांत केवळ ५ धावा देऊन ५ बळी घेतले. लखनौचा संघ २० षटकं देखील खेळू शकला नाही अन् १६.३ षटकांतच १०१ धावांवर सर्वबाद झाला. आता मुंबईच्या फ्रँचायझीने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार यादवच्या एका कृतीनं तिलक वर्माची झोप उडाली.
 

"पडलो पण हरलो नाही...", मुंबईविरूद्धच्या पराभवानंतर गौतम गंभीरने चाहत्यांचे मानले आभार

व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, गाढ झोपेत असलेल्या तिलक वर्माची सूर्या फिरकी घेत आहे. सूर्या झोपेत असलेल्या तिलकच्या तोंडात लिंबू पिळतो अन् त्याची झोप मोड होते. रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह हिला देखील हे पाहून हसू आवरत नाही. 

मुंबईची फायनलकडे कूच
मुंबईने लखनौच्या नवाबांचा पराभव करून फायनलकडे कूच केली आहे. काल झालेल्या सामन्यात फलंदाजीसाठी कठीण वाटत असलेल्या खेळपट्टीवर मुंबईच्या फलंदाजांनी साजेशी खेळी केली. कॅमेरून ग्रीनने २३ चेंडूत ४१ धावांची सर्वाधिक खेळी केली, तर सूर्यकुमार यादवने (३३) धावा करून सन्मानजनक लक्ष्य उभारण्यात हातभार लावला. १८३ धावांचा बचाव करताना मुंबईने चमकदार कामगिरी केली. युवा आकाश मधवालने सर्वाधिक ५ बळी घेतले, तर ख्रिस जॉर्डन आणि पियुष चावला यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.

BCCI vs PCB वाद! आशिया कपचे भवितव्य IPL फायनलनंतर ठरेल; जय शाहंचं मोठं विधान

 

Web Title:  Mumbai Indians franchise shared a funny video of Suryakumar Yadav and Tilak Verma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.