MI squad for IPL 2023: Indian Premier League Auction 2023 Live : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023 ) च्या आज झालेल्या मिनी लिलावात सॅम कुरन ( Sam Curran) हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. कॅमेरून ग्रीन, बेन स्टोक्स व निकोलस पूरन यांच्यावरही पैशांचा पाऊस पडला. काही अनकॅप्ड खेळाडूही करोडपती झाले. झिम्बाब्वेचा सिकंदर रजा, नामिबियाचा डेव्हिड विसे आणि आयर्लंडचा जोशुआ लिटल यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले. आजच्या आयपीएल लिलावात २९ परदेशी खेळाडूंसह ८० जणांना करारबद्ध केले गेले आणि त्यासाठी १६७ कोटी रुपये मोजले गेले.
६ तास १० मिनिटांत ८० खेळाडूंसाठी झाला १६७ कोटींचा व्यवहार, इंग्लंडचे खेळाडू ठरले महागडे
मुंबई इंडियन्सने आज कॅमेरून ग्रीसाठी १७.५ कोटी रुपये मोजले आणि ऑसी खेळाडूला आनंद गागनात मावेनासा झाला. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील पावर हाऊस असल्याचे मत व्यक्त करताना त्याने आनंद व्यक्त केला. कधी एकदा मैदानावर उतरतोय अशी इच्छा त्याने व्यक्त केली. ग्रीननंतर झाय रिचर्डसन ( १.५ कोटी), पीयूष चावला ( ५० लाख), ड्यूआन येनसन ( २० लाख), विष्णू विनोद ( २० लाख), शॅम्स मुलानी ( २० लाख) आणि नेहाल वधेरा ( २० लाख) यांच्यासाठी मुंबईने आज किंमत लावली.
मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, जसप्रीत बुमाराह , जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड. डेवॉल्ड ब्रेव्हिस, जसप्रीत बुमराह, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमेरून ग्रीन, झाय रिचर्डसन, राघव गोयलMumbai Indians squad for IPL 2023: Rohit (C), Surya, Kishan, Bumrah, Jofra, Brevis, David, Green, Tilak, Ramandeep, Stubbs, Vishnu Vinod, Shokeen, Arjun, Jhye, Behrendorff, Kartikeya, Duan Jansen, Mulani, Nehal Wadhera, Arshad Khan, Madhwal, Chawla and Raghav Goyal.यंदाच्या पर्वातील टॉप महागडे खेळाडू...पंजाब किंग्स - सॅम कुरन ( १८.५० कोटी)मुंबई इंडियन्स - कॅमेरून ग्रीन ( १७.५० कोटी)चेन्नई सुपर किंग्स - बेन स्टोक्स ( १६.२५ कोटी)लखनौ सुपर जायंट्स - निकोलस पूरन ( १६ कोटी)सनरायझर्स हैदराबाद- हॅरी ब्रूक ( १३.२५ कोटी)सनरायझर्स हैदराबाद- मयांक अग्रवाल ( ८.२५ कोटी) गुजरात टायटन्स - शिवम मावी ( ६ कोटी)राजस्थान रॉयल्स - जेसन होल्डर ( ५.७५ कोटी)दिल्ली कॅपिटल्स - मुकेश कुमार ( ५.५० कोटी)सनरायझर्स हैदराबाद - हेनरीच क्लासेन ( ५.२५ कोटी)