wpl auction date । मुंबई : महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. WPLच्या पहिल्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सची फ्रँचायझी सज्ज झाली आहे. मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगसाठी आपल्या प्रशिक्षक संघाची घोषणा केली आहे. यामध्ये विश्वविजेत्या शार्लोट एडवर्ड्स आणि झुलन गोस्वामी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, भारतीय महिला संघाची माजी गोलंदाज झुलन गोस्वामी आगामी महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाची मार्गदर्शक आणि गोलंदाजी प्रशिक्षक असणार आहे. तर इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्सकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी असणार आहे. याशिवाय देविका पळशीकर फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे.
WPL 2023 साठी मुंबई इंडियन्स सज्ज
मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने 3 महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांची घोषणा करून आगामी हंगामासाठी रणशिंग फुंकले आहे. विश्वविजेत्या इंग्लंडच्या महिला संघाची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्स मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत असेल. तर पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेती झुलन गोस्वामी टीम मेंटॉर आणि गोलंदाजी प्रशिक्षक अशा दुहेरी भूमिकेत असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारी अष्टपैलू खेळाडू देविका पळशीकर ही फलंदाजी प्रशिक्षक असेल. तसेच तृप्ती चंदगडकर भट्टाचार्य संघ व्यवस्थापक म्हणून कार्य करेल. मुंबई इंडियन्सने अलीकडेच महिला प्रीमियर लीग (WPL) मधील मुंबईच्या संघासाठी बोली जिंकली.
मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीच्या मालक नीता अंबानी यांनी म्हटले, "शार्लोट एडवर्ड्स, झुलन गोस्वामी आणि देविका पळशीकर यांचे MI #OneFamily मध्ये स्वागत करताना मला आनंद होत आहे. भारतातील महिला खेळासाठी हा एक रोमांचक काळ आहे. आमच्या महिला खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने देशाचा गौरव केला आहे. खेळाच्या सामर्थ्याने महिलांनी आनंद आणि उत्साह पसरवल्यामुळे आणि सशक्त महिलांच्या संपूर्ण नवीन पिढीला प्रेरणा दिली आहे."
WPL 2023साठी मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक संघ
- मुख्य प्रशिक्षक - शार्लोट एडवर्ड्स
- गोलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक - झुलन गोस्वामी
- फलंदाजी प्रशिक्षक - देविका पळशीकर
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Mumbai Indians have announced the coaching staff for the Women's Premier League 2023 with Charlotte Edwards, Jhulan Goswami and Devieka Palshikaar in charge
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.