मुंबई इंडियन्सच्या अडचणींत वाढ

बंगळुरु येथे मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) आणि मुंबई इंडीयन्स यांच्यात झालेला सामना रंगतदार होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:43 AM2018-05-03T04:43:23+5:302018-05-03T04:43:23+5:30

whatsapp join usJoin us
 Mumbai Indians have a problem | मुंबई इंडियन्सच्या अडचणींत वाढ

मुंबई इंडियन्सच्या अडचणींत वाढ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाझ मेमन
संपादकीय सल्लागार
बंगळुरु येथे मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) आणि मुंबई इंडीयन्स यांच्यात झालेला सामना रंगतदार होता. यंदाचे सत्र पुढे कशाप्रकारे पुढे जाईल हे या सामन्यावर मोठ्या प्रमाणात निर्भर होते. त्यात मुंबईकरांसाठी खूप निराशाजनक बाब ठरली, की ते अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या सामन्यात पराभूत झाले. नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबीने फारकाही धावा उभारल्या नव्हत्या. मात्र तरीही त्यांनी बाजी मारली. जी अपेक्षा मुंबईने खेळपट्टीकडून केली होती, त्यात त्यांना निराशा आली. खेळपट्टी गोलंदाजीला पोषक असल्याने फलंदाजी सोपी नव्हती. त्यामुळे या खेळपट्टीवर १६७ धावा उभारण्याची आरसीबीची कामगिरी खरंच चांगली होती.
माझ्यामते या सामन्यामध्ये दोन टर्निंग पॉइंट होते. पहिले म्हणजे अखेरच्या षटकात आरसीबीच्या कॉलिन डी ग्रँडहोम याने मिचेल मॅक्क्लेनघनच्या गोलंदाजीवर २३ धावा वसूल केल्या आणि हेच एक मोठे अंतर राहिले. त्यामुळे जर १५३ च्या आसपास आरसीबीला रोखले असते, तर मुंबईने कदाचित विजय मिळवला असता. दुसरे म्हणजे मुंबईचा कर्णधार आणि मुख्य फलंदाज रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. या शिवाय दोन्ही संघांचे क्षेत्ररक्षण व गोलंदाजी प्रदर्शन चांगले होते. या सामन्याआधी आरसीबीची गोलंदाजी कमजोर वाटत होती. गेल्या काही सामन्यांत त्यांचे गोलंदाज डेथ ओव्हर्समध्ये धावांची खैरात करताना दिसत होते. पण मुंबईविरुद्ध असे झाले नाही. पण आता या पराभवानंतर मुंबईकर खूप अडचणीत आले आहेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता त्यांना उर्वरीत सर्व सामने जिंकावेच लागतील.
त्याचबरोबर फेअर प्ले अवॉर्डच्या यादीत विजय मिळवल्यानंतरही आरसीबीची घसरण झाली. फेअर प्ले म्हणजे नक्की काय? तर सामन्यादरम्यान खेळाडूंच्या वर्तनानुसार संघाला काही गुण मिळतात. प्रतिस्पर्धी खेळाडूंसह हुज्जत घालणे, पंचांसोबत वाद किंवा अतिरिक्त अपिल करणे यामुळे संघाला काही गुणांचा फटका बसतो. मुंबईविरुद्ध हीच बाब आरसीबीबाबत पाहण्यास मिळाली. कोहली खूप जोशमध्ये दिसला. काही वेळा वादही झाला आणि त्याचा फटका संघाला बसला. आता फेअर प्ले यादीत आरसीबी तळाला असल्याची चिंता कोहलीला नसेल, कारण त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचे दोन गुण मिळवणे होते आणि ते त्याने मिळवलेही आहे.
दुसरीकडे गुरुवारी किोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात एक रोमांचक लढत रंगेल. या संघांमध्ये झालेल्या चेन्नई येथील पहिल्या लढतीत चेन्नईने थोडक्यात विजय मिळवला होता. आता हाच थरार इडन गार्डन्सवर रंगेल. दोन्ही संघ फॉर्ममध्ये आहेत. तरी कोलकातावर काहीसे दडपण असेल. कारण ते अव्वल चारमध्ये जरी असले, तरी त्यांचे गुण कमी आहेत.
जर ते चेन्नईविरुद्ध हरले, तर खालच्या चार संघांना याचा फायदा होईल,
विशेष करुन आरसीबीला. त्यामुळे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नईला नमविणे कोलकातासाठी कठीण असेल. त्याचवेळी घरच्या मैदानावर पराभव टाळण्याचा कोलकाताचा प्रयत्न राहिल. कारण यामुळे बाहेर जाऊन जिंकणे कठीण होऊन जाते.

Web Title:  Mumbai Indians have a problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.