Mumbai Indians IPL 2025 : आगामी हंगामासाठी गेल्या महिन्यात सौदी अरबमध्ये खेळाडूंचा मेगालिलाव झाला. भारताचा रिषभ पंत (२७ कोटी) आणि श्रेयस अय्यर (२६.७५ कोटी) हे सर्वात महागडे खेळाडू ठरले. मुंबई इंडियन्सच्या संघानेही अनेक प्रतिभावान खेळाडूंना संघात स्थान दिले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला १२.५० कोटींना संघात घेतले. तसेच दीपक चहरवर ९.२५ कोटींची बोली लावली. लिलाव पूर्ण झाल्यावर आता मुंबई इंडियन्सने कोचिंग आणि सपोर्ट स्टाफकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्याच दृष्टीने संघाला दोन वेळा वर्ल्ड कप जिंकून देणारा कार्ल हॉपकिन्सन (Carl Hopkinson) याला मुंबई इंडियन्सने फिल्डिंग कोच म्हणून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.
कोण आहे कार्ल हॉपिकन्सन?
इंग्लंडचा माजी क्रिकेटर कार्ल हॉपिकन्सन याला मुंबई इंडियन्सच्या संघाने फलंदाजी प्रशिक्षक ताफ्यात दाखल करून घेतले आहे. २०१९ वनडे वर्ल्डकप आणि २०२२ टी२० वर्ल्डकप विजेत्या इंग्लंडच्या संघाचा तो फिल्डिंग कोच होता. गेली सात वर्षे त्याने इंग्लंड क्रिकेट संघाचा फिल्डिंग कोच म्हणून कार्यभार सांभाळला आहे. होप्पो असे त्याचे टोपणनाव आहे. १९९८ नंतर पहिल्यांदा इंग्लंडचा अंडर-१९ चा संघ २०२२च्या वर्ल्डकपच्या फायनलला पोहोचला होता, त्या संघाचा फिल्डिंग कोच म्हणूनही होप्पोने काम पाहिले आहे. कार्ल हॉपकिन्सनने जुने फिल्डिंग कोच जेम्स पॅमेंट याची जागा घेतली. जेम्स गेली सात वर्षे मुंबईचा फिल्डिंग कोच होता. त्याच्या कारकिर्दीत मुंबईने २०१९ आणि २०२० ची ट्रॉफी जिंकली होती. मात्र आता मुंबई इंडियन्सने त्याला करारमुक्त केले आहे.
कसा आहे मुंबई इंडियन्सचा संघ?
रिटेन केलेले खेळाडू- जसप्रीत बुमराह (भारत) १८ कोटी, सूर्यकुमार यादव (भारत) १६ कोटी ३५ लाख, हार्दिक पांड्या (भारत) १६ कोटी ३५ लाख, रोहित शर्मा (भारत) १६ कोटी ३० लाख, तिलक वर्मा (भारत) ८ कोटी
विकत घेतलेले खेळाडू- ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) १२ कोटी ५० लाख, नमन धीर (भारत) ५ कोटी २५ लाख, रॉबिन मीन्झ (भारत) ६५ लाख, कर्ण शर्मा (भारत) ५० लाख, रायन रिकल्टन (दक्षिण आफ्रिका) १ कोटी, दीपक चहर (भारत) ४ कोटी ८० लाख, वील जॅक्स (इंग्लंड) ५ कोटी २५ लाख, अश्विनी कुमार (भारत) ३० लाख, मिचेल सँटनर (न्यूझीलंड) २ कोटी, रीस टॉपली (इंग्लंड) ७५ लाख, के एल श्रीजिथ (भारत) ३० लाख, राज अंगद बावा (भारत) ३० लाख, सत्यनारायणा राजू (भारत) ३० लाख, बेव्हन जेकब्स (दक्षिण आफ्रिका) ३० लाख, अर्जुन तेंडुलकर (भारत) ३० लाख, लिझाद विल्यम्स (दक्षिण आफ्रिका) ७५ लाख, विग्नेश पुथुर (भारत) ३० लाख.