WPL 2023: Mumbai Indians च्या संघाने महिला प्रीमियर लीगच्या (WPL) अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर शुक्रवारी (२४ मार्च) झालेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबईने यूपी वॉरियर्सचा ७२ धावांनी पराभव केला. आता अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल, ज्यांनी गुणतालिकेत पहिले स्थान मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. अंतिम सामना २६ मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.
इस्सी वोंगने हॅटट्रिक घेत रचला इतिहास
एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सला विजयासाठी 183 धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांचा संपूर्ण डाव 110 धावांवरच आटोपला. यूपी वॉरियर्सकडून किरण नवगिरेने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. डावाच्या 13व्या षटकात किरण नवगिरे, सिमरन शेख आणि सोफी एक्लेस्टोन यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद करून हॅट्ट्रिक घेतली. तिने मुंबई इंडियन्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. WPL मध्ये हॅट्ट्रिक घेणारी इस्सी वोंग पहिलीच गोलंदाज ठरली. याशिवाय अष्टपैलू नॅट सिव्हर-ब्रंटनेही मुंबईसाठी शानदार फलंदाजी करताना नाबाद 72 धावा केल्या.
त्याआधी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली आणि पॉवरप्लेमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात 46 धावा केल्या. मुंबईची यास्तिका भाटिया 21 धावांवर बाद झाली. यास्तिका बाद झाल्यानंतर हीली मॅथ्यूज आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांच्यात ३८ धावांची भागीदारी झाली. मॅथ्यूज 26 धावांवर बाद झाली. हरमनप्रीत कौर आल्यावर सिव्हर-ब्रंटने 12व्या षटकात चौकार आणि एक षटकार ठोकत प्रतिस्पर्धी संघावर आक्रमणाचा वेग वाढवला. मुंबईने पुढच्या षटकात शंभरी गाठली. कर्णधार हरमनप्रीत 14 धावांवर माघारी गेली. यानंतर सिव्हर ब्रंटने अमेलिया केर (२९ धावा) सोबत चौथ्या विकेटसाठी ६० धावा जोडून मुंबईला चार विकेट्सवर १८२ धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबई इंडियन्सने शेवटच्या पाच षटकांत ६६ धावा केल्या. सिव्हर-ब्रंटने 38 चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 72 धावा केल्या.
Web Title: Mumbai Indians into the Finals after beating UP warriors to face Delhi Capitals for title match Issy Wong takes hattrick
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.