CSKच्या डावातील १९व्या षटकापर्यंत ७८ लाख प्रेक्षक असेला आकडा २०व्या षटकात ८४ लाखांपेक्षा अधिक गेला. महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) अफलातून कामगिरीने CSKला रोमहर्षक विजय मिळवून दिला. आयपीएल २०२२मधील हा सर्वात ड्रामाटिक सामना ठरला. १९व्या षटकापर्यंत सामना मुंबई जिंकेल असे वाटत होते, परंतु महेंद्रसिंग धोनीने २०व्या षटकाच्या ४ चेंडूंवर सामना फिरवला. मैदानावर दोन तगडे संघ भिडत असताना स्टेडियमवर त्यांच्या चाहत्यांमध्येही कमालीची ठस्सन सुरू होती. १९व्या षटकात मुंबईच्या चाहत्यांनी जल्लोष सुरू केला होता आणि त्यांनी चेन्नईच्या चिमुरड्या चाहत्याला डिवचले. त्यानंतर जे घडले ते पाहा.
मुंबई इंडियन्सने तिलक वर्माच्या नाबाद ५१ आणि सूर्यकुमार यादव( ३२) व हृतिक शोकीन ( २५) यांच्या धावांच्या जोरावर ७ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली. चेन्नई सुपर किंग्सच्या मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात रोहित शर्मा व इशान किशनला माघारी पाठवले आणि त्यानंतर डेवॉल्ड ब्रेव्हिसची विकेट घेत मुंबईचे कंबरडे मोडले. ड्वेन ब्राव्होने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात चेन्नईची अवस्थाही वाईट झाली होती. रॉबिन उथप्पा ( ३०) व अंबाती रायुडू ( ४०) यांनी डाव सावरला, परंतु MIच्या डॅनिएल सॅम्सने ( ४-३०) तो पुन्हा कोसळवला. महेंद्रसिंग धोनीने मॅच फिनिशरची भूमिका चोख वटवताना १३ चेंडूंत नाबाद २८ धावा चोपल्या. ड्वेन प्रेटोरिसनेही २२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. चेन्नईने हा सामना ३ विकेट्स राखून जिंकला.
१९व्या षटकात मुंबईच्या चाहत्यांचा जल्लोष अन् २०व्या षटकात CSKचा पलटवार