Mumbai Indians IPL 2022 schedule: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानांवर कल्ला करणार; बघा कधी, केव्हा, कुठे कोणाकोणाशी भिडणार!

Mumbai Indians IPL 2022 schedule: २६ मार्च ते २९ मे या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्घ कोलकाता नाइट रायडर्य यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 06:10 PM2022-03-06T18:10:38+5:302022-03-06T18:11:08+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai Indians IPL 2022 schedule: Rohit Sharma & Co. to play Delhi Capitals at Brabourne Stadium on March 27 in season opener | Mumbai Indians IPL 2022 schedule: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानांवर कल्ला करणार; बघा कधी, केव्हा, कुठे कोणाकोणाशी भिडणार!

Mumbai Indians IPL 2022 schedule: मुंबई इंडियन्स घरच्या मैदानांवर कल्ला करणार; बघा कधी, केव्हा, कुठे कोणाकोणाशी भिडणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mumbai Indians IPL 2022 schedule: बीसीसीआयने रविवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर केले. मुंबई  आणि पुणे येथे होणाऱ्या ७० सामन्यांचे हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २६ मार्च ते २९ मे या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्घ कोलकाता नाइट रायडर्य यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. TATA IPL 2022 schedule announced पाचवेळा आयपीएलचा चषक उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( Delhi Capitals ) २७ मार्चला ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. मागील पर्वात मुंबईला प्ले ऑफमध्येही प्रवेश करता आला नव्हता, त्यामुळे आता घरच्या मैदानांवर धुमाकूळ घालण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील  MI सज्ज झाला आहे. 


मुंबई इंडियन्सला A गटात स्थान दिले गेले असून त्यांच्यासोबत दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाइट रायडर्स,  राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे या संगात आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता, राजस्थान, दिल्ली, लखनौ व चेन्नई यांच्याशी दोनवेळा भिडणार, तर हैदराबाद, बंगळुरू, पंजाब व गुजरात यांच्याविरुद्ध एकच सामना खेळणार आहे.   चेन्नई सुपर किंग्सचा संघ हैदराबाद, बंगळुरू, पंजाब, गुजरात व मुंबई यांच्याशी प्रत्येकी दोन, तर कोलकाता, राजस्थान, दिल्ली व लखनौ यांच्याशी प्रत्येकी एक सामना खेळणार.  

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ चेन्नई, हैदराबाद, पंजाब, गुजरात व राजस्थान यांच्याशी प्रत्येकी दोन, तर मुंबई, कोलकाता, दिल्ली व लखनौ यांच्यासोबत प्रत्येकी १ सामना खेळणार आणि कोलकाता नाइट रायडर्सचा संघ मुंबई, राजस्थान, दिल्ली, लखनौ व हैदराबाद यांच्याशी प्रत्येकी दोन, तर चेन्नई, बंगळुरु, पंजाब व गुजरात यांच्याशी प्रत्येकी एक सामना खेळणार.


मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, इशान किशन ( १५.२५ कोटी), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ३कोटी), बासील थम्पी ( ३० लाख), मुरुगन अश्विन ( १.६० कोटी), जयदेव उनाडकट ( १.३० कोटी),  मयंक मार्कंडे ( ६५ लाख) , एन तिलक वर्मा ( १.७० कोटी), संजय यादव ( ५० लाख), जोफ्रा आर्चर ( ८ कोटी), डॅनिएल सॅम्स ( २.६० कोटी), टायमल मिल्स ( १.५० कोटी) ,टीम डेव्हिड ( ८.२५ कोटी), अनमोलप्रीत सिंग ( २० लाख), रमणदीप सिंग ( २० लाख), आर्यन जुयल ( २० लाख),  रिले मेरेडिथ ( १ कोटी), मोहम्मद अर्षद खान ( २० लाख), हृतिक शोकीन ( २० लाख), फॅबियन अॅलन ( ७५ लाख), आर्यन जुनाल ( २० लाख), अर्जुन तेंडुलकर ( ३० लाख), राहुल बुद्धी ( २० लाख).


Mumbai Indians IPL 2022 Time Table 

  • २७ मार्च - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • २ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, डी वाय पाटील स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • ६ एप्रिल - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ९ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १३  एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, एमसीए स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १६ एप्रिल - मुंबई इंडियन्स विरुद्ध  लखनौ सुपर जायंट्स , ब्रेबॉर्न स्टेडियम, दुपारी ३.३० वाजल्यापासून
  • २१ एप्रिल -  मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २४ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ३० एप्रिल - राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ६ मे - गुजरात टायट्सन विरुद्ध मुंबई इंडियन्स, ब्रेबॉर्न स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • ९ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, डी वाय पाटील स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १२ मे - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • १७ मे  - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून
  • २१ मे - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, वानखेडे स्टेडियम, सायं. ७.३० वाजल्यापासून

Web Title: Mumbai Indians IPL 2022 schedule: Rohit Sharma & Co. to play Delhi Capitals at Brabourne Stadium on March 27 in season opener

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.