Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2022 MI vs LSG Live: यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स अतिशय खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. त्यांना पहिल्या विजयासाठी अजूनही झुंजावे लागत आहे. मुंबई संघाने सलग सात सामने गमावले आहेत. संघाचे गोलंदाज आणि फलंदाज आपल्या लयीत दिसत नाहीत, पण या अडचणींमुळे रोहित शर्मा भविष्यात आणखी मजबूत होईल, असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू डब्ल्यूव्ही रमण (W V Raman) यांनी व्यक्त केला आहे.
IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला ज्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे भविष्यातील आव्हानांसाठी अधिक भक्कम आणि मजबूत होईल, असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू डब्ल्यूव्ही रमण यांनी व्यक्त केला आहे. मुंबई इंडियन्सने IPL च्या यंदाच्या हंगामात पहिले सातही सामने गमावले आहेत, त्यामुळे त्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात आली आहे. याचबाबत क्रिकेट डॉट कॉमशी बोलताना रमण यांनी मत व्यक्त केलं.
"तुम्ही किती काळ खेळत आहात किंवा तुम्ही किती अनुभवी आहात याने काही फरक पडत नाही. खेळात आणि जीवनात तुम्ही नेहमी शिकत राहता. मुंबई इंडियन्सचा हरतोय हे रोहित शर्मासाठी चांगलंच आहे, कारण या कठोर अनुभवातून रोहित अधिक भक्कम नेतृत्वासाठी तयार होईल. IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला ज्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्याने भविष्यात रोहित शर्मा अधिक मजबूत होईल तसेच, मुंबई इंडियन्समधील त्याच्या या अनुभवाचा टीम इंडियासाठी फायदाच होईल", असे रमण म्हणाले.
रोहित शर्मा स्वत: बॅटने धावा करण्यासही सातत्याने असमर्थ ठरताना दिसतोय. तो गेली महिनाभर कठीण प्रसंगाचा सामना करत आहे. त्याने १६ च्या सरासरीने आणि १२६ च्या स्ट्राइक रेटने फक्त ११४ धावा केल्या आहेत. पण मुंबईला रविवारी त्यांच्या घरच्या मैदानावर, वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध विजयाची नोंद करून पराभवाचा सिलसिला तोडण्याची संधी आहे. मुंबईचा संघ तब्बल १०८३ दिवसांनी वानखेडे क्रिकेट खेळणार आहे.
Web Title: Mumbai Indians losing matches is Good for Rohit Sharma as Team India Captain here is the reason why IPL 2022 MI vs LSG Live Updates
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.