Join us  

IPL 2025 : 'सुपला शॉट' स्टायलिश Look दाखवत MI नं सूर्यावर टाकला 'रुमाल'

मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडियावरून सातत्याने सूर्यकुमार यादवची झलक पाहायला मिळते. त्यामुळे तो आगामी आयपीएलमध्ये याच संघाकडून खेळताना दिसेल, याचे संकेतच मिळत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 4:22 PM

Open in App

आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी सातत्याने कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतो. आता MI नं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला केंद्रस्थानी ठेवून खास पोस्ट शेअर केलीये.

खास पोस्टसह मुंबई इंडियन्सनं शेअर केली आतली गोष्ट

मुंबई इंडियन्सनं शेअर केलेल्या पोस्टला दिलेले कॅप्शन आणि सूर्यकुमारचा अंदाज एकदम कडक आहेच. पण या पोस्टच्या माध्यमातून अंबानींच्या फ्रँचायझी संघाने मेगा लिलावाआधीचा आपला डावही स्पष्ट केल्याचे संकेत यातून मिळतात. मेगा लिलावाआधी कोणता संघ कोणत्या खेळाडूला रिटेन करणार? याची चर्चा आता रंगू लागली आहे. मुंबई इंडियन्सच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून जो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे त्यातून सूर्यकुमार यादवचा 'सुपला शॉट' अंदाज दाखवत मेगा लिलावाआधी मुंबई इंडियन्सनं  सूर्या दादावर रुमाल टाकल्याचे संकेत मिळतात.

सूर्याच्या अवतीभोवती युवा स्टार खेळाडूही दिसला

भारतीय टी-२० संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवसह या व्हिडिओमध्ये आणखी एका खेळाडूची झलक पाहायला मिळते. सूर्यकुमार यादवच्या स्टायलिश आणि फनी अशा अतरंगी अंदाजातील व्हिडिओमध्ये इशान किशनची झलक तुम्हाला दिसून येईल. हा व्हिडिओ मनोरंजक वाटत असला तरी रिटेन खेळाडूंच्या यादीतील चेहरेच मुंबई इंडियन्सच्या संघाने यातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय का? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. 

याआधीही MI नं दाखवून दिला होता सूर्या दादाचा हटके अंदाज 

मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून याआधीही सूर्यकुमार यादवचा व्हिडिओ शेअर केला  होता. "दादाचा विषय सर्वात हार्ड" या कॅप्शनसह शेअर केलेल्या सूर्याच्या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळाली होती. त्यानंतर आता नवा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. सातत्याने सूर्यकुमार यादवची मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिसणारी झलक तो आगामी हंगामातही याच संघाचा भाग असेल, ही गोष्ट पक्की ठरल्याचे संकेत देणारा आहे.

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवमुंबई इंडियन्सआयपीएल २०२४