What is the equation for MI to pip KKR? : गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) आज सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. इशान किशन व सूर्यकुमार यादव यांच्या नेत्रदिपक फटक्यांनी MI च्या चाहत्यांना खूश केलं. कर्णधार रोहित शर्मा ( १८) माघारी परतल्यानंतरही इशानची फटकेबाजी सुरूच होती. त्यानं १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि हे मुंबई इंडियन्सडून झालेलं सर्वात जलद अर्धशतक ठरलं. त्यानंतर त्यानं ३२ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांसह ८४ धावा कुटल्या. हार्दिक पांड्याला ( १०) बढती मिळाली, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. किरॉन पोलार्ड ( १३) अपयशी ठरला. त्यानंतर सूर्यकुमार यादवनं ४० चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावा करताना मुंबईला ९ बाद २३५ धावांपर्यंत मजल मारून दिली.
आता प्ले ऑफचं गणित जुळवण्यासाठी मुंबईला काय करावं लागेल?
कालच्या विजयानंतर कोलकाताच्या खात्यात १४ गुण झाले असून त्यांचा नेट रन रेट हा ०.५८७ इतका झाला आहे. मुंबईच्या खात्यात १२ गुण आहेत आणि त्यांनी हैदराबादला नमवले तर त्यांचेही १४ गुण होतील. पण, मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट हा -०.०४८ इतका होता आणि त्यांना हैदराबादवर फक्त विजय पुरेसा नाही. मुंबईला हैदराबादविरुद्ध २००+ धावा कराव्या लागतील आणि १७०+ धावांनी विजय मिळवावा लागेल. तरच ते प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकतात. मुंबईसाठी हे समिकरण होते.
आज मुंबईनं ९ बाद २३५ धावा केल्यामुळे त्यांना आता सनरायझर्स हैदराबादला ६४ धावांवर गुंडाळावे लागणार आहे. जर त्यांनी असे करण्यात यश मिळवले, तर ते १७१ धावांच्या विजयासह प्ले ऑफसाठी प्रवेश करण्यात यशस्वी ठरतील.
Web Title: For Mumbai Indians to make it to the play-offs they will need to bowl Sunrisers Hyderabad by 235-171= 64 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.