Join us  

नवा नियम MI चं टेन्शन वाढवणारा; रोहित किंवा हार्दिक दोघांपैकी एकाला 'नारळ' देण्याची वेळ येणार?

 हा नवा नियम मुंबई इंडियन्सची गोची करणारा असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 10:30 AM

Open in App

Rohit Sharma Or Hardik Pandya Mumbai Indians Can Face Trouble IPL Retention Rule: आयपीएल २०२५ च्या हंगामाआधी मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. या हंगामाच्या आधी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी कोणत्या खेळाडूंना रिटेन करायचं हा प्रश्न प्रत्येक फ्रँचायझीसमोर आहे. या स्पर्धेतील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय फ्रँचायझी संघ मुंबई इंडियन्ससमोर तर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीसीसीआयकडून खेळाडूंना रिटेन करण्यासंदर्भात लवकरच नवा नियम लागू करेल.  हा नवा नियम मुंबई इंडियन्सची गोची करणारा असल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

रोहित की हार्दिक; MI समोर असेल मोठा पेच 

आयपीएलमधील फ्रँचायझी संघांसाठी खेळाडू कायम (IPL retention rule) ठेवण्यासंदर्भात बीसीसीआयने अद्याप नियम स्पष्ट केलेला नाही. पण काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येत आहे की, प्रत्येक फ्रँचायझी संघाला ५ खेळाडू रिटेन करण्याची मुभा देण्यात येणार आहे. या परिस्थितीत प्रत्येक फ्रँचायझीला तीन भारतीय खेळाडूंना रिटेन करता येईल. या नियमामुळे मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा किंवा हार्दिक पांड्या या दोघांपैकी एकाला रिटेन करून एकाला रिलीज करण्याची वेळ येऊ शकते. 

नव्या नियम ४ स्टारपैकी एकाला नारळ द्यायला लावणार?

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात गत हंगामात कॅप्टन्सी करताना दिसलेला हार्दिक पांड्या, पाच वेळा MI संघाला चॅम्पियन करणारा माजी कॅप्टन रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव अशी तगडी फौज आहे. या खेळाडूंना कायम ठेवण्यावर मुंबई इंडियन्सचा जोर असेल. बीसीसीआयने रिटेन खेळाडूंसदर्भात फक्त तीन भारतीय खेळाडूंना कायम करण्यासंदर्भातील नियमाला अंतिम स्वरुप दिले तर मुंबई इंडियन्सच्या यापैकी एकाला रिलीज करावे लागेल. या परिस्थितीत हार्दिक पांड्या किंवा रोहित शर्मा यापैकी एकाला रिलीज करून एकाला रिटेन करण्याचा कठीण निर्णय मुंबई इंडियन्सच्या संघाला घ्यावा लागू शकतो.

गत हंगामात कॅप्टन्सी बदलामुळं माजली होती खळबळ; ती गोष्ट अजूनही रोहितच्या मनात सलतीये?

गत हंगामात मुंबई इंडियन्सच्या एका निर्णयामुळे चांगलीच खळबळ माजली होती.  गुजरातच्या ताफ्यातून या फ्रँचायझी संघाने हार्दिक पांड्याला पुन्हा आपल्या संघात आणले. एवढेच नाही तर रोहित शर्माला बाजूला करत  त्याच्या गळ्यात कॅप्टन्सीची माळही घातली. या गोष्टीमुळे रोहित शर्मा नाराज असल्याची देखील चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. त्यामुळे तोच मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याचे देखील बोलले जाते. 

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सरोहित शर्माहार्दिक पांड्यासूर्यकुमार अशोक यादवजसप्रित बुमराह