Rohit Sharma, Mumbai Indians vs Gujarat Titans, IPL 2023 Qualifier 2 : स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. या दोघांमध्ये दुसरा क्वालिफायर अहमदाबाद येथे खेळवला जाईल. मुंबई आणि गुजरातमधून जो संघ जिंकेल, तो 28 मे रोजी एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अंतिम सामना खेळेल. हार्दिक पांड्याचा गुजरात आणि रोहित शर्माची मुंबई या मोसमात तिसऱ्यांदा आमनेसामने आहेत. दोघांमधील पहिल्या सामन्यात गुजरातने 55 धावांनी तर दुसऱ्या सामन्यात मुंबईने 27 धावांनी बाजी मारली होती.
आता पुन्हा एकदा दोघेही मोठ्या स्पर्धेत आमनेसामने आहेत. मागील दोन्ही सामन्यांवर नजर टाकली तर मुंबईचा खरा सामना फक्त 12 षटकांचा आहे. या 12 षटकांमध्ये रोहितच्या फलंदाजांनी धावा केल्या तर गुजरातची अवस्था कठीण होऊन बसेल, अन्यथा ही 12 षटके त्यांच्या पराभवाची कहाणी लिहू शकतात. क्वालिफायर 2 मध्ये मुंबईसाठी महत्त्वाची 12 षटके म्हणजे मोहम्मद शमी, राशिद खान आणि नूर अहमद या तिघांची 4-4 षटके आहेत. हे तिन्ही गोलंदाज रोहितच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. (Mohammad Shami Rashid Khan Noor Ahmed)
शमीच्या नावावर सर्वाधिक विकेट
वेगवान गोलंदाज शमीने 15 मध्ये 17.38 च्या सरासरीने 26 विकेट घेतल्या आहेत. त्याच्याकडे सध्या पर्पल कॅप आहे. गुजरातचा स्टार गोलंदाज राशिद खान पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राशिदने 19 च्या सरासरीने 25 विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच दोघांनी मिळून आतापर्यंत 51 विकेट घेतल्या आहेत. नूर अहमदने 11 सामन्यात 14 विकेट घेतल्याl. हे तिघेही मुंबईसाठी किती धोकादायक ठरू शकतात, हे त्यांच्या विकेट्सच्या आकड्यांवरून कल्पना करणे सहज शक्य आहे. त्यातही विकेट्स सोबतच ते धावांवरही नियंत्रण ठेवतात. अशा परिस्थितीत मुंबईचा खरा सामना गुजरातच्या या १२ षटकांतच ठरणार आहे.
Web Title: Mumbai Indians need to pass by these 12 overs of Gujarat Titans to win match and enter IPL 2023 Final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.