इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) लिलावात मुंबई इंडियन्स संघानं पहिल्याच प्रयत्नात ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस लीनला 2 कोटीच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. लिलावापूर्वी कोलकाता नाइट रायडर्सनं लीनला रिलीज केलं होतं. त्यामुळे लीनसाठी जोरदार चुसर पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु तसं घडलं नाही. त्याच्यावर बोली लावणारा मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ ठरला. या स्फोटक फलंदाजानं रविवारी बिग बॅश लीगमध्ये वादळी खेळी केली. त्यानं 35 चेंडूंत 94 धावा चोपताना ब्रिस्बन हिट्स संघाला दोनशेपार धावा उभारून दिल्या. तत्पूर्वी दुबईत झालेल्या टी 10 लीगमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपली आहे आणि त्यानं स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही पटकावला. KKRनं रिलीज केल्यानंतर लीनची बॅट चांगलीच तळपली आहे. टी 10 लीगमध्ये मराठा अरेबियन्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लीननं 8 डावांत 236.30 च्या स्ट्राईक रेटनं 371 धावा केल्या. त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर तो बिग बॅश लीगमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे. प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बन हिट्स संघानं 4 बाद 209 धावा चोपल्या. मॅक्स ब्रायंट (1) आणि सॅम हिझलेट ( 10) हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर लीन आणि मॅट रेनशो यांनी संघाचा डाव सावरला. लीननं 35 चेंडूंत 4 चौकार व 11 षटकारांची आतषबाजी करातना 94 धावा केल्या. बेंजामिन मॅनेटीनं त्याला बाद केले. रेनशोनं 39 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 60 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्स संघाला 7 बाद 161 धावाच करता आल्या. ब्रिस्बन हिट्स संघानं 48 धावांनी विजय मिळवला. बिग बॅश लीगच्या इतिहासात 2000 धावा करणारा लीन हा पहिलाच फलंदाज ठरला.
पाहा व्हिडीओ...