Join us  

Tim David on Rohit Sharma, Pollard : Mumbai Indiansचे मालक Akash Ambani यांच्या विधानावर ८.२५ कोटींचा क्रिकेटपटू टीम डेव्हिड म्हणतो...

IPL 2022 चा मेगा लिलाव संपताच आकाश अंबानी यांनी केलं होतं महत्त्वाचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 7:28 PM

Open in App

IPL 2022 Mega Auction मध्ये Mumbai Indiansने उत्तम संघबांधणी केली. त्यांनी मोजक्याच खेळाडूंवर मोठी बोली लावली. इशान किशन हा हंगामातील सर्वात महागडा खेळाडू १५ कोटी २५ लाखांत मुंबईच्या संघात आला. त्या खालोखाल मुंबईच्या संघाने एका नव्या चेहऱ्यासाठी तब्बल ८ कोटी २५ लाख रूपये मोजले. मुंबईने Tim Davidला आपल्या ताफ्यात फिनिशरच्या भूमिकेसाठी हार्दिक पांड्याच्या जागी घेतलं. टीम डेव्हिड मुंबईच्या संघात Pollard च्या साथीने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल, असं संघमालक आकाश अंबानी यांनीही स्पष्ट केलं होतं. त्यावर टीम डेव्हिडने प्रतिक्रिया दिली.

"पोलार्डबरोबर फलंदाजी करण्याच्या कल्पनेनेच मला फार मजा वाटतेय. पोलार्ड हा पहिल्यापासूनच माझा आदर्श आहे. त्याची फटकेबाजी मला खूप आवडते. मी त्याची फटकेबाजी पाहून अनेक गोष्टी शिकलो. माझ्या महत्त्वाच्या सामन्यांच्या आधी मी त्याच्या काही इनिंग्स पाहतो आणि माझ्या खेळात सुधारणा करतो. आम्ही दोघं जर एकमेकांना सांभाळून घेत तुफान फटकेबाजी करू शकलो, तर आम्ही मधल्या टप्प्यात आणि शेवटच्या षटकांमध्ये नक्कीच जोरदार धावा करू शकू आणि संघाला विजय मिळवून देऊ शकू", असं टीम डेव्हिड म्हणाला. 

कर्णधार रोहित शर्माबद्दलही टीम डेव्हिडने आपली भूमिका मांडली. "रोहित शर्मा हा जागतिक दर्जाचा अप्रतिम क्रिकेटपटू आहे. तो अगदी सहजतेने फलंदाजी करतो आणि फटकेबाजीही करतो. त्याची फलंदाजी पाहणं ही पर्वणीच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिभावान खेळाडूच्या साथीने खेळायलं मिळणं हे खूप मोठं भाग्यच आहे. वर्ल्ड क्लास खेळाडू कसा विचार करतात, तेदेखील मला त्यांच्यासोबत राहून समजू शकेल", असं टीम डेव्हिनने सांगितलं. 

 

टॅग्स :मुंबई इंडियन्सआकाश अंबानीरोहित शर्माकिरॉन पोलार्ड
Open in App