Join us

झक्कास! Mumbai Indians ने लावली कोटींची बोली, त्याच १८ वर्षीय फिरकीपटूने रचला इतिहास

Allah Gazanfar, Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या संघाने नुकत्याच झालेल्या मेगालिलावात अफगाणिस्तानच्या १८ वर्षीय फिरकीपटूला आपल्या ताफ्यात घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 20:25 IST

Open in App

Allah Gazanfar, Mumbai Indians, AFG vs ZIM : झिम्बाब्वेचा टी-२० मालिकेत पराभव केल्यानंतर अफगाणिस्तानने आता तीन सामन्यांची वनडे मालिकाही जिंकली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी २१ डिसेंबर रोजी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर खेळला गेला. अफगाणिस्तानने हा सामना ८ विकेटने जिंकला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत झिम्बाब्वेला केवळ १२७ धावांवर रोखले. झिम्बाब्वेच्या पराभवात फिरकीपटू अल्लाह गझनफरने मोठा वाटा होता. अवघ्या १८ वर्षांच्या अल्लाह गझनफरने अर्धा संघ केवळ ३३ धावा देत तंबूत पाठवला आणि संघाला विजय मिळवून दिला.

अल्लाह गझनफरने ५ बळी घेतले

अफगाणिस्तान संघात अल्लाह गझनफर अजूनही नवीन आहे. तो अफगाणिस्तानसाठी फक्त ११ वनडे खेळला आहे पण त्याने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याची भेदक गोलंदाजी झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतही पाहायला मिळाली. यादरम्यान मिस्ट्री स्पिनरने ५ विकेट्स घेतल्या. १० षटकांत या गोलंदाजाने केवळ ३३ धावा देत झिम्बाब्वेचा अर्धा संघ बाद केला.

प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने हे लक्ष्य २७ षटकांत केवळ २ गडी गमावून पूर्ण केले आणि सामना व मालिका २-० अशी जिंकली.

दोन वेळा ५ विकेट घेणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू

गझनफरने आपल्या छोट्याशा कारकिर्दीत मोठी कामगिरी केली. आतापर्यंत त्याने वनडे क्रिकेटमध्ये ११ सामने खेळले आहेत. त्याने या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि ११ सामन्यांमध्ये दोनदा एका सामन्यात ५ बळींची किमया साधली. यापूर्वी त्याने नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध ६.३ षटकांत २६ धावांत ६ बळी घेतले होते. दोन वेळा ५ बळी घेणारा तो सर्वात तरुण गोलंदाज ठरला. त्याच्या नावावर २१ विकेट्स झाल्या आहेत.

मुंबई इंडियन्सने ४.८० कोटींना केलं खरेदी

गझनफरला IPL 2025 च्या लिलावादरम्यान मुंबई इंडियन्सने खरेदी केले. त्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये होती, पण त्याला ४.८० कोटींची किंमत मिळाली. यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत होता. मात्र, त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या त्याला यावेळी संधी देऊ शकतो अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सआयपीएल लिलावअफगाणिस्तान