मुंबई :
आयपीएल-१५ मध्ये बुधवारी मुंबई इंडियन्स सलग पाचव्यांदा पराभूत झाला. दहा संघांच्या गुणतालिकेत खाते न उघडता हा संघ तळाच्या स्थानावर इतकी एवढी वाईट अवस्था यापूर्वी कधीच झाली नव्हती. पाच वेळाही आयपीएल जिंकणारा मुंबई यंदा प्ले ऑफच्या आधीच बाहेर पडतो की काय, अशी चर्चा होऊ लागली. चर्चेच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा आढावा...
विजयापासून लांबच…आतापर्यंत झालेल्या सामन्यात विजय न मिळवू शकलेला मुंबई हा एकमेव असा आहे. दुसरीकडे चेन्नईने आरसीबीवर २३ धावांनी विजय मिळवून विजयाचा दुष्काळ संपविला होता. या संघाला प्ले ऑफ गाठायचे असेल तर चमत्कार घडावा लागेल.
असा चमत्कार या संघाने २०१५ ला केला होता. यंदा मात्र दहा संघ असल्याने अखेरच्या चार संघात रोहितचा संघ असेल, याची शक्यता क्षीण आहे. २०११ ला देखील दहा संघ होते. तेव्हा प्रत्येक संघाने १४ सामने खेळले. प्ले ऑफ गाठणाऱ्या चार संघांचे प्रत्येकी १६ गुण होते. १४ गुण असलेले संघ मात्र पात्र ठरले नव्हते. आठ संघांचा सहभाग असलेल्या पर्वात १४ गुण मिळविणाऱ्या संघांनी प्ले ऑफ गाठले होते. यंदा प्ले ऑफसाठी १६ गुण लागतील.रोहित शर्माला २४ लाखांचा दंड पुण्यात बुधवारी झालेल्या पंजाबविरुद्ध लढतीत कूर्मगती गोलंदाजीसाठी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याला २४ लाखांचा, तर मुंबई संघातील अन्य सदस्यांना प्रत्येकी सहा लाखांचा दंड ठोठावण्यात आला. निर्धारित वेळेत किमान षटके न टाकल्यामुळे (एका तासात १४.१ षटके) हा दंड बसला. याआधी रोहितने दिल्लीविरुद्ध पहिल्यांदा चूक केल्याने १२ लाखांचा दंड बसला होता. दुसऱ्यांदा केलेल्या चुकीमुळे दंडाची रक्कम दुप्पट झाली.
आठ विजयांची गरज- मुंबईला आता नऊपैकी आठ सामने जिंकावेच लागतील. दोन सामने गमावल्यास काही खरे राहणार नाही. - या संघाच्या जमेची बाब अशी की त्यांनी याआधी सतत पराभवानंतर ओळीने सामने जिंकून थेट जेतेपदापर्यंत मजल गाठली होती. - आठ संघांचा समावेश असलेल्या २०१५ च्या पर्वात मुंबईने सुरुवातीच्या सहापैकी पाच सामने गमावले. त्यानंतर पुढील आठ सामन्यांपैकी सात सामने जिंकून प्ले ऑफमध्ये धडक दिली. शिवाय जेतेपदावरही नाव कोरेले होते. - यंदा नऊ सामन्यांपैकी एखादा सामना गमावला तरी फरक पडणार नाही; पण ‘नेट रनरेट’ चांगला ठेवण्यासाठी मोठ्या फरकाने आठ सामने जिंकावेच लागतील. तरच मुंबई ‘प्ले ऑफ’ गाठू शकेल.